बुधवारी रात्री दोन फेरीवाल्यांकडून ८७,५०० रुपये किमतीची मेटाकॅलोन क्रिस्टल पावडर ( Methaqualone powder ) जप्त केली. या दोन्ही आरोपींनी नुकतीच नवी मुंबईत ड्रग्सची विकण्यास सुरवात केली होती.

फेरीवाल्यांच्या उपस्थितीची माहिती देताना एएनसी अधिका्ऱ्यांनी सांगितले की सीबीडी बेलापूर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा लावला होता. आरोपी वांद्रे येथील रहिवासी ३६ वर्षीय सरफराज शेख; आणि सांताक्रूझ येथील रहिवासी ४७ वर्षीय खालिद खान ह्या दोघांना सापळा रचून पकडण्यात आले आहे.

“दोघेजण स्कूटरने प्रवास करुन घटनास्थळाजवळ थांबले. त्यांची ओळख पटल्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या ताब्यातून ३५ ग्रॅम ड्रग्स सापडली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी दिली.

नवी मुंबई: कोट्यावधी रुपयांच्या ड्रग्स सोबत नायजेरियन नागरिक पकडला

पुढील तपासणीसाठी एसी अधिकाऱ्यांनी त्यांचे वाहन, ₹ १,२०० रोख आणि फोन जप्त केले आहेत.

आरोपींनी अशी कबुली दिली की त्या भागात अंमली पदार्थ ( Methaqualone powder ) विक्री करण्याचा त्यांचा हेतू होता आणि त्यानंतर त्यांच्यावर अंमली पदार्थांची औषधे आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी कुठून ड्रग्ज मिळवतात याचा शोध पोलिस घेत आहेत.

पीएमसीची 3 सप्टेंबरपासून पनवेलमधील मॉल पुन्हा सुरू करण्याची परवानगी