बेलपाडा गावचे सामाजसेवक अजित म्हात्रे यांनी जासई ते न्हावाशेवा रस्ता राष्ट्रीय महामार्ग १०८ ची कि.मी. ४.५ ते ८.८ पाहणी केली असता सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे बनवलेले असून सदर रस्त्यावर अनेक मोठे मोठे खड्डे पडलेले निदर्शनास आले . त्यामुळे समाजसेवक अजित म्हात्रे यांनी सदर रस्ता तयार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे डिपॉझिट जप्त करून त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याकरिता मा.श्री. बांगर साहेब, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण यांचे कार्यालयात दिनांक २०/१०/२०२० रोजी त्यांचे सहकार्यासोबत निवेदन सादर केलेले आहे.

सदर रस्ता तयार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर मुदतीत योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही तर अजित म्हात्रे यांची पुन्हा एकदा जासई ते न्हावाशेवा रस्ता राष्ट्रीय महामार्ग १०८ रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे मार्गावर जे मोठे मोठे खड्डे निर्माण झालेत त्यामध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा शासनाला दिलेला आहे.

अजित म्हात्रे यांचे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण यांना निवेदन

पाताळगंगा नदीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणांवर उद नावाच्या जलचर प्राण्याचा हल्ला