आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत असून याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे. विमान प्रवास, आरोग्य विमा, गॅस सिलिंंडर, मिठाईसह अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार असल्यामुळे याची माहिती असणे आवश्यक आहे.

वाहन परवाना, आरोग्य विमा

आजपासून वाहन परवाना आणि गाडीच्या रजिस्ट्रेशनची ओरिजिनल कॉपी सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विम्या मध्ये समाविष्ट होणाऱ्या आजारांचीही संख्या वाढवण्यात आली आहे. परंतु यामुळे आरोग्य विम्याचा हप्ता महागेल. मात्र आरोग्य विम्या अंतर्गत तुम्हाला जास्त सुविधा मिळतील. आज १ ऑक्टोबरपासून आरोग्य विम्याचे नियम पूर्णतः बदलणार आहेत. आता एकदा पॉलिसी विकल्यानंतर ग्राहकाने क्लेम केल्यास कंपनी मनमानी पद्धतीने तो क्लेम नाकारू शकत नाही.

तसेच विम्यासाठीचा वेटींग पिरियडही कमी होणार आहे. तुम्ही जर सलग ८ वर्ष पॉलिसी प्रिमीयम भरला असेल तर कोणतीही कंपनी कुठलंही कारण देऊन क्लेम रद्दबातल करू शकत नाही. तसेच अधिकाधिक आजारांचा समावेश पॉलिसीत करता येणार आहे. परंतु याचा परिणाम प्रीमियमच्या दरात दिसून येणार असून प्रीमियमचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे.

मिठाईवर वैद्यता दिनांक (Expiry Date) अनिवार्य

आजपासून मिठाईवर एक्स्पायरी डेट लिहीणे अनिवार्य असेल. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) एक आदेश जारी करून मिठाईच्या दुकानांना दुकानात उपलब्ध असलेल्या सर्व मिठाईची मुदत संपण्याची तारीख किंवा ‘आधीची बेस्ट तारीख’ जाहीर करणे अनिवार्य केले आहे. आता, मिठाईच्या दुकानात सर्व मिठाईसमोर ‘तारखेपूर्वीचे सर्वोत्कृष्ट’ असं नमूद करणे आवश्यक असेल.

टिव्ही सेट्स

टिव्ही सेट्सची किंमत ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

टोल दरात वाढ

आजपासून मुंबईत टोलचे दर वाढणार असून आधीच महागाई आणि कोरोनामुळे कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांना वाढलेल्या टोल दरांचा सामना करावा लागणार आहे. आजपासून टोलच्या दरात ५ ते २५ रूपयांची वाढ होणार आहे. मासिक पासाचे दरही वाढतील. त्यामुळे महागाईत अधिकच भर पडेल.

पनवेल: धावत्या लोकलमधून ढकलून पत्नीची हत्या; पतीला अटक