चांभार्लीतील घोटी परिसरातील पाताळगंगा नदीपात्रात पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी तिघांना ‘उद’ या जलचर प्राण्याने हल्ला करून जखमी केले असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निमाण झाले आहे.

चांभार्ली घोटी परिसरातील पाताळगंगा नदीपात्रावर जय म्हात्रे, रजत मुंढे, सौरभ जांभुळकर व आणखी दोघे असे पाच तरुण दुपारच्या सुमारास पोहायला गेले होते. पोहत असताना या तरुणांची नजर पाण्यात बुडणाऱ्या प्राण्यावर पडली. पाण्यात बुडणारे कुत्र्याचे पिल्लू असावे, असा त्यांनी अंदाज बांधला व त्याला वाचविण्याकरिता तिघे पोहत त्याच्याजवळ पोहोचले. यावेळी जय म्हात्रे, रजत मुंढे आणि सौरभ जांभुळकर या तिघांनी लहान पिल्लू समजून वाचवायला जात असताना, त्या जलचर प्राण्याने तिघांवर हल्ला केला. पाण्यात असतानाच या तरुणांच्या पायाला ठिकठिकाणी चावा घेऊन त्यांना जखमी केले.

पाताळगंगा नदिच्या पाण्यातील हा मुंगसासारखा दिसणारा हल्ला करणारा प्राणी कोणता आहे याबाबत तरुणांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांना विचारले असता, त्यांनी ‘उद’प्राणी असल्याचे सांगितले. हा मुंगसासारखा दिसणारा प्राणी अचानक हल्ला करतो. हा प्राणी कुठून व कधी आला, याचा अंदाज नाही. तरी पाताळगंगा नदीत पोहायला जाऊ नये, सावधानता बाळगावी, असा इशारा चांभार्ली ग्रामपंचायत उपसरपंच दत्तात्रेय जांभले यांनी दिला आहे.

मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत नमूद करणे हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना बंधनकारक

One reply on “पाताळगंगा नदीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणांवर उद नावाच्या जलचर प्राण्याचा हल्ला”

Comments are closed.