Posted inउरण

उरणकरांना लवकरच पाईपलाईनने गॅस पुरवठा

उरणकरांना लवकरच पाईपलाईनने गॅस पुरवठा  उरण शहराला पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले .ओएनजीसीमधील नवीन गॅस प्लांटचे उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले .  पाईपलाईनद्वारे गॅस मिळावा ही उरणमधल्या नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. 

Posted inउरण

जेएनपीटीतून 7 लाखांचा माल चोरणाऱ्या ट्रेलर चालकास साथीदारासह अटक

जेएनपीटीतून 7 लाखांचा माल चोरणाऱ्या ट्रेलर चालकास साथीदारासह अटक  ओवरसीज पॉलीमर कंपनीने परदेशातून आयात केलेले प्लास्टिकचे दाणे जेएनपीटीमध्ये आले होते.  जेएनपीटीतून प्लास्टिकच्या दाण्यांचे ५ कंटेनर खोपट्याच्या गोदामात पाठविण्यात आले होते.त्यातील चार कंटेनर  मालासहत गोदामात पोहोचले ,परंतु एका कंटेनर  मध्ये माल कमी असल्याचे आढळले ,त्यामुळे पोलीसांकडे तक्रार करण्यात आली.पोलीसांच्या तपासात कंटेनरमधील काही खोके नवघर परिसरात काढून घेतल्या आणि नंतर पळस्पे […]

Posted inराज्य

विरारमध्ये बीएमडब्लू कारची अॅक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

 विरारमध्ये  बीएमडब्लू कारची अॅक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू  विरारमध्ये एका बीएमडब्लू कारने अॅक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अॅक्टिव्हाचे दोन तुकडे झाले आणि स्कूटरवरील स्त्री आणि पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. विरार पश्चिम येथील पुरापाडा येथे रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर बीएमडब्लूचा चालक कार तिथेच सोडून […]

Posted inदेश

पेट्रोल,डीझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल,डीझेलच्या दरात पुन्हा वाढ  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढलेल्या खनिज तेलाच्या किमतीमुळे आणि पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी मध्यरात्री पासून पेट्रोल आणि डीझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे.पेट्रोल प्रतीलिटर ३.१३ रुपयांनी तर डीझेल प्रतीलिटर २.७१ रुपयांनी वाढला आहे.मुंबईत आता पेट्रोल प्रतीलिटर ७४.१२ रुपये तर देझेल ५९.८६ रुपयांनी मिळेल.

Posted inनवी मुंबई

लग्नसराईत सोनसाखळी चोरांची वाढती दहशत

लग्नसराईत सोनसाखळी चोरांची वाढती दहशत नवी मुंबई,पनवेल,उरण परिसरात चोरी ,घरफोडी ,वाहन चोरी व महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढत आहेत. ह्या भागात रोज ३ ते ४ ठिकाणी दागिने हिसकावण्याच्या घटना घडत आहेत .नवी मुंबई परिसरात सीसीटीवी कॅमेरे ,नाकाबंदी असून पण चोऱ्यांच्या प्रमाणात कोणतीही कमी आलेली नाही.ह्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी […]

Posted inउरण

चिरनेरमध्ये संभाजी महाराज जयंती होणार जोरात साजरी

चिरनेरमध्ये संभाजी महाराज जयंती होणार जोरात साजरी  १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निम्मित चिरनेर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.हे कार्यक्रम युद्धनौका विक्रांत सेवाभावी संस्थेच्या वतीने सादर होणार असून येथे संभाजी महाराजांचे जीवनचरित्र व्याख्यानातून सदर होणार आहे तसेच इतिहास कालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.रात्री संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.ह्या कार्यक्रमाचे […]

Posted inविदेश

एका दिवसात ३ ठिकाणी भूकंप…तिन्ही केंद्र एका सरळ रेषेत

एका दिवसात ३ ठिकाणी भूकंप…तिन्ही केंद्र एका सरळ रेषेत  आज दुपारी १२:३०-१ च्या दरम्यान नेपाळ ला पुन्हा एकदा ७.४ तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले.भूकंपाचे केंद्र नेपाळची राजधानी काठमांडू पासून ८२ किमी पूर्वेला चीनच्या सिमेजवळ जमिनीच्या १८.५ किमी खाली होते. आताच २५ एप्रिल २०१५  रोजी 7.८ तीव्रतेच्या झटक्यांनी नेपाळ मध्ये ८००० लोकांचा मृत्युला सामोरे जावे लागले होते.त्या […]

Posted inमुरुड

मुरूडच्या फणसाड अभयारण्यात बिबट्या चा सुळसुळाट

मुरूडच्या फणसाड अभयारण्यात बिबट्याचा सुळसुळाट मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्या शेजारील ग्रामस्थांना मागील काही दिवसात बिबट्याने चांगलेच भयभीत करून सोडले आहे. फणसाड अभयारण्याच्या ७० चौरस  किमीच्या क्षेत्रात बिबट्या,कोल्हे,मगर ,तरस अशी बरीच जंगली श्वापद आढळतात. मागील काही दिवसात येथे येणाऱ्या पर्याटकांची  संख्या पण चांगलीच वाढली होती. परंतु वारंवार ग्रामस्थांच्या  नजरेस पडणाऱ्या बिबट्या मुळे लोक भयभीत झाले  आहेत […]

Posted inदेश

केंद्र सरकारच्या ३ महत्वाकांशी योजना

केंद्र सरकारच्या ३ महत्वाकांशी  योजना  केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा याजना,अटल निवृत्ती वेतन योजनांची सुरवात दि .९ मे पासून केली आहे. सर्व सामान्यांचे आयुष्य विमा सुरक्षेच्या कक्षेत यावे यासाठी केंद्र सरकारने ह्या योजनांचा आरंभ केला आहे. वित्तमंत्री अरुण जेटलींनी ह्या योजनांची घोषणा केली योजनांबद्दल सविस्तर प्रधानमंत्री जीवन ज्योती […]

Posted inअलिबाग

पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना लाच घेताना अटक

 पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना लाच घेताना अटक  अविनाश पाटील यांनी अवैध तेलाचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी रसायनी येथील एका व्यावसायिका कडून 2 लाख रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईच्या पथकाने त्यांना रंगेहाथ  पकडले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अविनाश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली […]