Posted inराज्य

कोकण रेल्वेत लुटमार करणारी टोळी सक्रिय

कोकण रेल्वे मार्गावर लूट करणारी टोळी सक्रिय झाली आहे. प्रवाशांवर पाळत ठेवून मध्यरात्री प्रवासी झोपल्यावर रेल्वेची चेन खेचून गाडी थांबविली जाते आणि प्रवाशांच्या मौल्यवान सामानाची लूट केली जाते. या अनोळखी टोळीने दोन स्वतंत्र रेल्वेत प्रवास करणाऱ्या मुंबईतील चार कुटुंबीयांना लुटले आहे. हा प्रकार गुरु वारी मध्यरात्री घडला असून रोहा पोलीस ठाण्यात प्रवाशांनी तक्र ार दाखल […]

Posted inपनवेल

पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे एनएमएमटी बस सेवा सुरु.

पनवेल : एनएमएमटीच्या दुसऱ्या बससेवेचा प्रारंभ शुक्रवारी झाला असून पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे वसाहतीदरम्यान ही बस धावणार आहे. या प्रवासात एकूण १४ बसथांबे आहेत. पनवेलमधील शिवाजी चौकातून या बससेवेला प्रारंभ झाला. कफ संस्थेने केलेल्या पाठपुराव्यानंतर पनवेलकरांना पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर अशा पहिल्या टप्प्यातील बससेवेचा लाभ मिळाल्यावर शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील बससेवेला सुरु वात झाली. […]

Posted inपेण

एकविरा देवीच्या पालखी सोहळ्याला लागले गालबोट..

महाराष्ट्राचे आराध्यदैवत कुलस्वामीनी श्री एकविरा देवीच्या कार्ला गडावर आई एकविरेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र पालखी सोहळ्यापूर्वी पालखीच्या मानावरुन ठाण्याचे भाविक आणि पेण येथील पालखीचे मानकरी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे या सोहळ्याला गालबोट लागले. आई एकविरेचा पालखी सोहळा पाहण्यासाठी तसेच देवीच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो भाविक गडावर आले होते. […]

Posted inअलिबाग

अल्युमिनीअम बोट निर्मितीत अलिबाग जागतिक नकाशावर

पीएनपी ग्रुपच्या मरिन फ्रंटीयर्सने नेदरलँड येथील खाजगी कंपनीसाठी ९० टक्के भारतीय बनावटीच्या भारतातील सर्वात मोठया अशा अ‍ॅल्युमिनीअमच्या व्यावसायीक बोटीची निमिर्ती करुन एक नवा विक्रम केला आहे. या बोटीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आले. यावेळी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, पीएनपी ग्रुपच्या संचालक नृपाल पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी […]

Posted inदेशराज्य

यंदाची होळी बिना पाण्याची ..

गेल्या काही वर्षा प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे  लागत आहे.त्यामुळे पाण्याची बचत होण्यासाठी यावर्षी होळीत रेन डान्स वर बंदी आणली आहे. यंदाची होळी ही कोरडी होळी साजरी करावी असे आव्हाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. धुळवडीच्या दिवशी पाण्याचे फुगे फेकण्याचे प्रकार देखील दर वर्षी समोर येत आहेत.या गोष्टीला सर्व […]

Posted inदेश

अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

भुवनेश्वर, दि. १४ – भारतात तयार करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या न्युक्लर अग्नी-१ या अण्वस्त्रवाह क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी करण्यात आली. जमीनीवरुन जमीनीवर ७०० कीमी पर्यंत हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे. भारतीय लष्कराने आज सकाळी ९:११ वाजता अब्दुल कलाम बेटावरुन (व्हीलर बेटे) यशस्वी चाचणी घेण्यात आली. १२ टन वजन व १५ मीटर लांबी असलेल्या […]

Posted inखालापूर

आयआरबीकडून पाण्याची चोरी!

खालापूर : कर्जत जलसंपदा विभागाने नुकताच आयआरबी कंपनीला पाणी चोरी प्रकरणी तब्बल ७५ लाख दंड ठोठावला आहे. जलसंपदा विभागाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून एक्स्प्रेस वेच्या स्थापनेपासून आजतागायतपर्यंत अनधिकृत पाणी उपसा करून पाण्याचा कर न भरल्याने उपसा पंप सील करण्यात आले आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर पाताळगंगा नदीपात्रातून दांड वाडी निंबोडे गावाच्या हद्दीतून किलोमीटर […]

Posted inखालापूर

नाढळ पाझर तलावात मातीचा भराव!

खालापूर : राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नाढळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. चौकजवळील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या या पाझर तलावात मातीचा भराव टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने हाणून पाडले असून, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या तलावात अनधिकृत काम करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत असताना कर्जत लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने […]

Posted inउरण

उरणमध्ये मंगळवार, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाबरोबरच मोरबे धरणातीलही पाणीसाठा घटत चालल्याने हेटवणे धरणातून रानसईला केला जाणाऱ्या पाणीपुरवठय़ातही निम्म्याने घट झाली आहे. तर लघू पाठबंधारे विभागानेही पाणी कपातीचे आदेश दिल्याने येत्या मंगळवारपासून उरणमधील ग्रामपंचायती, उरण शहर आणि औद्योगिक विभागाला मंगळवार आणि शुक्रवार पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती एमआयडीसीने दिली आहे.    रानसई धरणाची क्षमता कमी असल्याने उरण […]

Posted inउरण

करळ फाटय़ावर बहुमार्गी उड्डाणपूल

जेएनपीटी बंदरात रोजच्या ये-जा करणाऱ्या आठ हजार अवजड वाहनांमुळे तसेच तालुक्यातील वाढत्या प्रवासी व हलक्या वाहनांच्या ताणामुळे करळ पुलावर वाहतूक कोंडी होत असून, या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचआय)ने करळ फाटा येथे ५०० कोटी रुपये खर्चाचा मल्टीग्रेड सेप्रेटर(बहुमार्गी)उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या कामाला सुरुवात म्हणून साफसफाई व जमिनीची तपासणीही सुरू […]