Posted inदेश

दबंग सलमान खानच्या कुटुंबाला BMC चा दणका; तिघांविरोधात FIR दाखल

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं सलमान खानच्या (salman khan) कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. ]]]]>]]>मुंबई, 04 जानेवारी :  बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (Salman khan) कुटुंबाला मुंबई महापालिकेनं (BMC) दणका दिला आहे. सलमानच्या कुटुंबातील तिघांविरोधात बीएमसीनं FIR दाखल केला आहे. सोहेल खान (sohail khan), अरबाज खान (arbaaz khan) आणि निर्वाण खान (nirvaan khan) यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्यांच्याविरोधात…

Posted inकोंकणजिल्हारायगड

हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनचे प्रस्ताव कंपनीकडे सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2020-21 मध्ये कोकणात आंबा व काजू पिकासाठी जिल्ह्याकरिता बजाज अलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनी लि.पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना  विमा संरक्षण देवून नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही  शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी ही याेजना सुरू करण्यात आली […]

Posted inजिल्हारायगड

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कुशल, अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  हा मेळावा दि. 24 ते दि.26  नोव्हेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत फक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या […]

Posted inदेश

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00  या कालावधीत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना संदर्भात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या  जिल्हा समन्वयक सौ.अंजली पाटील या […]

Posted inमहाराष्ट्ररायगड

महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगटातील महिलांना बँक सखी होण्याची सूवर्णसंधी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बँक सखी निवड ही स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना बँक संबंधित कामामध्ये योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यासाठी म्हणून उचललेले एक मोठे पाऊल असून त्यांना ही एक सूवर्णसंधी आहे.       बचतगट समूहातील महिलांच्य बँक संबधित येणाऱ्या छोट्याछोट्या अडचणी दूर करून  त्यांची कामे सहजरित्या पार पाडणे, हा बँक सखी नियुक्तीमागील हेतू आहे.       बँक सखी निवडीचे […]

Posted inउरण

उरण : दादरपाडा येथे एका अज्ञात व्यक्तीने घेतला गळफास

उरण: दादरपाडा स्टॉप जवळ काल सकाळी एका अज्ञात व्यक्तीने नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपला जीव गमावला आहे. सदर मृत व्यक्ती कुठे राहते याची अद्यापपर्यंत कोणतीही ओळख पटलेली नाही. सदर गळफास घेतलेल्या व्यक्तीची हत्या आहे की आत्महत्या याचाही पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत. समाजसेवक अजित म्हात्रे यांना सिडको भवन येथे अटक

Posted inउरणनवी मुंबई

समाजसेवक अजित म्हात्रे यांना सिडको भवन येथे अटक

अखिल भारतीय किसान सभा अंतर्गत नवी मुंबई विमानतळ कमिटीतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता आज दिनांक २७/१०/२०२० रोजी सिडको भवनाला घेराव घालून बेमुदत आंदोलनाला सकाळी 8 वा. सुरवात केली. त्यानंतर त्याठिकाणी राजकीय दबाव तंत्राचा वापर होऊन पोलिसांनी अजित म्हात्रे यांचेसह अनेक आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक केली. यानंतर सर्वच स्तरातून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केलेल्या कार्याचा निषेध […]

Posted inजिल्हा

सावित्री खाडीवरील म्हाप्रळ-आंबेत पुलावरुन अवजड वाहतुकीस 31 जानेवारी पर्यंत बंदी

म्हाप्रळ-आंबेत पूल रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चार चाकी कार, जीप व्यतिरिक्त बस, ट्रक, टेम्पो यासारख्या सर्व अवजड वाहनांची वाहतूक दिनांक 31 जानेवारी, 2021 पर्यंत बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. सद्य:स्थितीत पुलाच्या Pier Cap Bracket च्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. पुलाच्या बेअरिंग बदलणे […]