युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे. […]
Category: कोंकण
व्वा रे पठ्ठ्या..! कोकणात एकदा नव्हे, दोनदा पिकविली स्ट्राॅबेरी
वैभववाडी (सिंधुदुर्ग) – मल्चिंग, ठिबक सिंचनचा वापर करीत तिथवली येथील गुलझार निजाम काझी या प्रयोगशील तरूण शेतकऱ्याने सलग दुसऱ्या वर्षी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्याने यावर्षी लागवड केलेल्या 1 हजार 200 रोपांमधून आता उत्पादन सुरू झाले असून कोकणातील लाल मातीतील स्ट्रॉबेरीची चव जिल्हावासीयांना चाखता येणार आहे. एवढेच नव्हे उपलब्ध स्ट्रॉबेरीच्या झाडांपासून रोपनिर्मीतीचे तंत्र देखील…
पर्यटन बहरले; अर्थकारणात मंदीच
मालवण (सिंधुदुर्ग) – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागताच्या निमित्ताने येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी राज्यासह देशातील विविध राज्यातील पर्यटकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पर्यटन बहरल्याचे दिसून आले; मात्र पर्यटकांनी खर्च करताना हात आखडता घेतल्याने साहसी जलक्रीडा प्रकार वगळता अन्य प्रकारच्या पर्यटन व्यावसायिकांचा म्हणावा तसा व्यवसाय झाला नसल्याचे दिसून आले. एकंदरीत कोरोना संकटानंतर पर्यटन बहरले…
दारू रोखण्यासाठी “ऍक्शन प्लॅन’
बांदा (सिंधुदुर्ग) – गोव्यातून राज्यात छुप्या पद्धतीने येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूमुळे राज्याच्या महसूलवर परिणाम होत आहे. त्यामुळे बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी “ऍक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला असून महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर 24 तास “वायूवेग’ पथके तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांचे दारू व्यावसायिकांशी संबंध असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने दारू वाहतुकीवर…
रोहा ते रत्नागिरी टप्पा पूर्ण; जूनअखेर रेल्वे विजेवर धावण्याची शक्यता
कणकवली (सिंधुदुर्ग) : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम ७२ टक्के पूर्ण झाले आहे. जून २०२१ अखेरपासून रोहा ते ठोकूर या ४४० किलोमीटर लांबीच्या मार्गावरून रेल्वे गाड्या विजेवर धावण्याचे नियोजन कोकण रेल्वेतर्फे केले आहे. रोहा ते रत्नागिरी हा विद्युतीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि बिजूर ते ठोकूर या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात बिजूर…
भाजपतील अंतर्गत मतभेद दूर करण्यात यश
रत्नागिरी – भाजपने तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजपमधील अंतर्गत मतभेद दूर करण्यात कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण यांना यश आले आहे. त्याचेच फलित म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन आणि नाराज गटातील माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने मैदानात उतरणार असून त्यांचा 6 जानेवारीपासून संयुक्त दौरा सुरू होणार आहे. …
हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनचे प्रस्ताव कंपनीकडे सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2020-21 मध्ये कोकणात आंबा व काजू पिकासाठी जिल्ह्याकरिता बजाज अलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनी लि.पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देवून नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी ही याेजना सुरू करण्यात आली […]
आयएमडीचा रेड अलर्ट. मुंबई, रायगड, रत्नागिरीत अति मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने (आयएमडी) पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
रत्नागिरीत करोना नियंत्रणात; ‘ही’ टक्केवारी लढ्याला बळ देणारी
सुनील नलावडे। रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यात रविवार सायंकाळपासून तांत्रिक अडचणीमुळे गेल्या २४ तासांतील करोना चाचणी अहवाल प्राप्त झालेले नाहीत, असे जिल्हा शासकीय रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात…