आता NMMT ने प्रवास करणे झाले सोप्पे. जॉपहॉप ऍप्स द्वारे बसचे कळणार ठिकाण. मित्रांनो.9582570571या नंबर वर मिसकॉल दया.मिसकॉल दिल्यावर लगेचच आपल्याला एक मेसेज मिळेल.त्या मेसेज मध्ये एक लिंक आहे.लिंक ओपन करून जॉपहॉप हे NMMT प्रशासनाचे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता.ह्या ऍप द्वारे NMMT प्रशासनाची कोणती बस कुठे आहे ? किती अंतरावर आहे.? आपल्याला बस कोणत्या […]
Category: रायगड
उरण : कंपन्या पैसे देणार कधी?
उरणमध्ये ओएनजीसी, वायू विद्युत केंद्र, भारत पेट्रोलियम तसेच बंदर क्षेत्रातील जेएनपीटी बंदर आहे. त्यांच्या नफ्यातील काही टक्के रक्कम ही सामाजिक साहाय्यता निधी म्हणून राखीव ठेवली जाते. त्याचा वापर परिसरातील विकासकामांसाठी करणे अपेक्षित असते. तरी गेल्या ४० वर्षांपासून उरणमधील उद्योगांकडून आवश्यक असलेला निधी येथील समाजाच्या विकासासाठी मिळालेला नाही. त्याची प्रतीक्षा आजही कायम आहे. हे सर्व उद्योग […]
पनवेलमध्ये रंगणार एरोमॉडेलिंग शो
विमानाचा शोध कसा लागला, विमान उडते कसे, विमान हवेत तरंगते कसे, त्यामागचे विज्ञान काय असा प्रश्न लहानांपासून सगळ्यांना पडलेला असतो. प्रत्यक्षात हे पाहता येणे शक्य नसले तरी पनवेलमध्ये एरोमॉडेलिंग शोच्या माध्यमातून हा शो सर्वांना पाहता येणार आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने निधी उपलब्ध करून हा शो विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवला आहे. १७ डिसेंबर १९०३ रोजी […]
अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या उरणतालुका आद्यक्ष कलावती भोईर यांच्या अनुषंगाने जे एन पि टी (ADAM ) येथें पाणजे गावचा सिंगापुर पोर्ट (PSA) विरोधात आमरण उपोषण आजचा चौथा दिवस
उरण – पाणजे : जे एन पि टी बंदर अंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरातील नोकरभरती आणि मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी याकरिता रविवार पासून जेएनपीटी विरोधात पाणजे गावातील महिलांनी उपोषण सुरु केले आहे. या गोष्टीची कोणत्याही न्युज वाल्यांनि अजून पर्यंत जनतेपुढे लाइव्ह प्रक्षेपणासाठी प्रयत्न केलेले नाही तरी आपण हि बातमी आपली गावाच्या हितासाठी कशी लोकांपर्यंतपोचवता […]
आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना ठार मारण्याची धमकी
पनवेल महापालिकेचे आयुक्त डाॅ. सुधाकर शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र आले आहे. या पत्रानंतर पनवेल पालिकेत एकच खळबळ माजली आहे. पालिकेत सुरू असलेल्या कारभारांचा संदर्भ देत कामाची पध्दत बदलली नाही, तर तुम्हाला संपवल्याखेरीज पर्याय नाही, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. या पत्रानंतर आयुक्त शिंदे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार […]
रायगड मधील रोहा अणि तळा तालुक्यात वाळूू माफिया बिनधास्त.
रायगड – रोहा अणि तळा तालुक्या मधिल खजनिवाडी – मंदाड या गावांंजवळील समुद्रात बेकायदेशीररित्या रेती/वाळूू उपसली जात असून प्रशासन मात्र सदर बाबिनकड़े दुर्लक्ष करुन बसले आहे. वाळू मफियांकडून वाळू उपसण्यासाठी वापरण्यात येणार्या सक्शन पंपमुळे येथील मछीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ह्या वाळूू मफियांवर प्रशासनाने कार्यवाई करावी असी येथील लोकांची मागणी आहे.
पक्ष्यांची शिकार टाळण्यासाठी पाणजे डोंगर, जेएनपीटी परिसरात वन विभागाचा पहारा
उरणमधील पाणजे डोंगर तसेच जेएनपीटी बंदर परिसरात दरवर्षी परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढू लागली आहे. उरणमधील पाणथळींवर येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची शिकार झाल्याच्या घटना यापूर्वी उरणमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे या परदेशी पाहुण्यांना सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी उरणच्या वन विभागाने सकाळी व सायंकाळी पाणथळींच्या परिसरात गस्त वाढवली आहे. हे थवे पाहण्यासाठी पक्षिप्रेमी, निरीक्षक, अभ्यासक छायाचित्रकार आणि […]
खारजमिनीचा प्रश्न सुटल्याशिवाय भराव टाकू देणार नाही
नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाच्या क्षेत्रात येणाऱ्या खारजमिनीच्या कुळांचे प्रश्न सुटल्याशिवाय या भागात मातीचा भराव टाकू दिला जाणार नाही, असा इशारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी देण्यात आला. सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी ही नवीन भूमिका घेतली. त्याच वेळी विस्थापित न होणाऱ्या सात गावांचे १५ […]
नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जुलै २0१७ पासून पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. भूसंपादन व इतर कारणांमुळे रखडलेल्या त्यापुढील मार्गाचे काम पुढील सव्वा वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. सिडको व रेल्वे यांच्या […]
इंडिया स्टीलची भिंत कोसळून ६ फॉर व्हीलर गाड़यांचे नुकसान झाले, जीवित हानी टळली.
आज सकाळी ६:३० ला खोपोली इंडिया स्टील च्या गलथानपणा मुळे अतिरिक्त असलेल्या भंगाराचा दबाव आणि पावसाच्या पाण्याचे व्यवस्तित निचरा होण्याचा मार्ग नसल्या मुळे भिंत कोसळून ६ फॉर व्हीलर गाड़यांचे नुकसान झाले .सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहीं.