Posted inपेण

एकविरा देवीच्या पालखी सोहळ्याला लागले गालबोट..

महाराष्ट्राचे आराध्यदैवत कुलस्वामीनी श्री एकविरा देवीच्या कार्ला गडावर आई एकविरेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र पालखी सोहळ्यापूर्वी पालखीच्या मानावरुन ठाण्याचे भाविक आणि पेण येथील पालखीचे मानकरी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे या सोहळ्याला गालबोट लागले. आई एकविरेचा पालखी सोहळा पाहण्यासाठी तसेच देवीच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो भाविक गडावर आले होते. […]

Posted inअलिबाग

अल्युमिनीअम बोट निर्मितीत अलिबाग जागतिक नकाशावर

पीएनपी ग्रुपच्या मरिन फ्रंटीयर्सने नेदरलँड येथील खाजगी कंपनीसाठी ९० टक्के भारतीय बनावटीच्या भारतातील सर्वात मोठया अशा अ‍ॅल्युमिनीअमच्या व्यावसायीक बोटीची निमिर्ती करुन एक नवा विक्रम केला आहे. या बोटीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आले. यावेळी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, पीएनपी ग्रुपच्या संचालक नृपाल पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी […]

Posted inखालापूर

आयआरबीकडून पाण्याची चोरी!

खालापूर : कर्जत जलसंपदा विभागाने नुकताच आयआरबी कंपनीला पाणी चोरी प्रकरणी तब्बल ७५ लाख दंड ठोठावला आहे. जलसंपदा विभागाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून एक्स्प्रेस वेच्या स्थापनेपासून आजतागायतपर्यंत अनधिकृत पाणी उपसा करून पाण्याचा कर न भरल्याने उपसा पंप सील करण्यात आले आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर पाताळगंगा नदीपात्रातून दांड वाडी निंबोडे गावाच्या हद्दीतून किलोमीटर […]

Posted inखालापूर

नाढळ पाझर तलावात मातीचा भराव!

खालापूर : राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नाढळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. चौकजवळील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या या पाझर तलावात मातीचा भराव टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने हाणून पाडले असून, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या तलावात अनधिकृत काम करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत असताना कर्जत लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने […]

Posted inउरण

उरणमध्ये मंगळवार, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाबरोबरच मोरबे धरणातीलही पाणीसाठा घटत चालल्याने हेटवणे धरणातून रानसईला केला जाणाऱ्या पाणीपुरवठय़ातही निम्म्याने घट झाली आहे. तर लघू पाठबंधारे विभागानेही पाणी कपातीचे आदेश दिल्याने येत्या मंगळवारपासून उरणमधील ग्रामपंचायती, उरण शहर आणि औद्योगिक विभागाला मंगळवार आणि शुक्रवार पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती एमआयडीसीने दिली आहे.    रानसई धरणाची क्षमता कमी असल्याने उरण […]

Posted inउरण

करळ फाटय़ावर बहुमार्गी उड्डाणपूल

जेएनपीटी बंदरात रोजच्या ये-जा करणाऱ्या आठ हजार अवजड वाहनांमुळे तसेच तालुक्यातील वाढत्या प्रवासी व हलक्या वाहनांच्या ताणामुळे करळ पुलावर वाहतूक कोंडी होत असून, या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचआय)ने करळ फाटा येथे ५०० कोटी रुपये खर्चाचा मल्टीग्रेड सेप्रेटर(बहुमार्गी)उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या कामाला सुरुवात म्हणून साफसफाई व जमिनीची तपासणीही सुरू […]

Posted inअलिबागखेळ

प्रो कबड्डी मधील रायगडचा चेहरा ‘अनिल काशिनाथ पाटील’…

नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या पर्वात पटना पायरटर्स ने यु मुंबाला  हरवून या मोसमातील विजेतेपद मिळवले.या मोसमातील अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा झाला आणि पटना ने मुंबई चा २८-३१ असा पराभव केला. प्रो कबड्डीच्या या मोसमात रायगड करांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली ती म्हणजे आपल्या रायगडच्या  अनिल काशिनाथ पाटील याची जयपूर पिंक पँन्थर मध्ये झालेली […]

Posted inनवी मुंबईपनवेल

नवी मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी..

    दिनांक -४ मार्च २०१६  आज मुंबई -नवी मुंबई आणि उपनगरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  सकाळीच कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली .या पावसांच्या सरींमुळे हवेत गारवा पसरला होता. आज सकाळीच आकाशामध्ये काळे ढग जमा झाले होते तसेच काही प्रमाणात विजा देखील चमकत होत्या.त्यामुळे सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.       पावसाच्या या […]

Posted inपनवेल

लवकरच होणार ‘ कर्नाळा-पनवेल ‘ परिसराचा विकास

                      नवी मुंबई ला लागुनच असलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कर्नाळा परिसराचा विकास लवकरच शासनाच्या मार्फत करण्यात येणार आहे.कर्नाळा हा परिसर वन कायद्या अंतर्गत येतो त्यामुळे  त्या कायद्याचे पालन करूनच कर्नाळा अभयारण्याचा विकास करण्यात येणार आहे. तसेच पनवेलहून भीमाशंकरला जाण्याकरिता मार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्याकरिता शासन निर्णय […]

Posted inखोपोली

मुंबई – पुणे -एक्स्प्रेस वेवर टँकर ने घेतला पेट..

मुंबई – पुणे -एक्स्प्रेस वेवर मंगळवारी  पुण्याहून मुंबई कडे कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला खोपोली येथील  ढेकू गावा जवळ अचानक आग लागली .या अपघातात टँकरच्या केबिनला आग लागल्यामुळे चालकाचा आगीत होरपळून  दुर्दैवी मृत्यू झाला .अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले व आग आटोक्यात आणली त्यामुळे संपूर्ण टँकरने पेट न घेता मोठा अनर्थ टळला. जळलेल्या टँकर च्या […]