Posted inउरण

जेएनपीटीचे खासगीकरण होणार नाही, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

खा.सुनिल तटकरे यांनी केंद्र सरकारसमोर मांडला हनुमान कोळीवाड्याच्या फेरपुनर्वसनाचा प्रश्न जेएनपीटीची जबाबदारी असल्याचे खडसावून सांगितले जेएनपीटीचे खासगीकरण होणार नाही, केंद्रीय मंत्र्यांची माहिती काल केंद्र सरकारच्या जहाज वाहतूक विभागातर्फे सागरतट समृद्धी योजनेसंदर्भात जहाज वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे खासदारांसोबत संवाद साधला. यावेळी जेएनपीटीबंदराच्या विकासासाठी पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांच्या व्यथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार […]

Posted inअलिबागरायगड

जिल्हा रुग्णालयातील अद्ययावत अतिदक्षता विभाग तसेच ऑक्सिजन कंटेनर यंत्रणेचे उद्घाटन संपन्न

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग  तसेच 6 किलाेलीटर ऑक्सिजनची क्षमता असलेल्या अद्ययावत आधुनिक मिनी बल्क कंटेनर सिस्टीम पफ इन्सूलेटेड माॅडिफाईड (mini bulk container system puf insulated modified ) यंत्रणेचे उद्घाटन आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, […]

Posted inमहाराष्ट्रमुंबईरायगड

रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर; जाणून घ्या काय असतील नियम

राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगिन अगेन अंतर्गत येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह यांनी विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल […]

Posted inअलिबाग

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त कुलाबा किल्ल्यावर जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शुक्रवार, दि.०२ ऑक्टोबर रोजी, सायं.४:०० वा. अलिबाग येथील कुलाबा किल्ला येथे जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर तसेच जिल्ह्यातील अन्य शासकीय विभागांचे […]

Posted inताज्या बातम्यानवी मुंबईपनवेल

पनवेल: धावत्या लोकलमधून ढकलून पत्नीची हत्या; पतीला अटक

पनवेल: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण करत तिला खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून बाहेर ढकलून देऊन तिची हत्या करणाऱ्या विशाल मनोज माने (२२) या पतीला पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. १७ सप्टेंबरला सायंकाळी दोघे पती-पत्नी पनवेल येथून मानखुर्द येथे जाताना ही घटना घडली होती. आरोपी विशाल हा मानखुर्द पुलाखाली फूटपाथवर असलेल्या झोपडपट्टीत राहण्यास […]

Posted inताज्या बातम्यारोहा

स्वदेस फॉउंडेशन मार्फत जागतिक हृदय दिवस साजरा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा विशेष सहभाग

आज दि.29 सप्टेंबर या जागतिक हृदय दिवसाचे औचित्य साधून स्वदेस फाऊंडेशन तर्फे हृदय शस्रक्रिया झालेल्या मुलांसोबत तसेच पालकांसोबत  डिजिटल झूम अँप  च्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, स्वदेस फौंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर […]

Posted inताज्या बातम्यारायगड

प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण – मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर २०२०  महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे- तालुका दिवस एकूण दिवस महाड सोमवार दि. ०५ ऑक्टोबर, १२ ऑक्टोबर व १९ ऑक्टोबर ३ श्रीवर्धन मंगळवार दि.०६ ऑक्टोबर व दि.२० आक्टोबर २ माणगाव बुधवार दि. ०७ ऑक्टोबर व दि.२१ ऑक्टोबर २ अलिबाग शुक्रवार दि.०९ ऑक्टोबर, […]

Posted inताज्या बातम्याराज्यरायगड

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधून पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण प्रक्रिया सुरु

राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आगारांमधून विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक, मासिक, त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण व टॉपअप अशा सर्व  प्रक्रिया सुरु करण्यात आल्या असून स्मार्ट कार्ड नोंदणीकरण पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. या प्रक्रिया आगारातील बसस्थानकावरील स्मार्ट […]

Posted inउरणताज्या बातम्यापनवेलरायगडरोहा

स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत ह्या आहेत रायगड जिल्ह्यातील प्रथम ३ ग्रामपंचायती

रायगड जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्मार्ट ग्राम योजना २०१८-२०१९ मध्ये पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रखम क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यामधील १५ तालुक्यांतील ८०९ ग्रामपंचायतीमधून शिवकर ग्रामपंचायतीची निवड झाली असून, शिवकर ग्रामपंचायतीला ५० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. या योजनेंतर्गत स्वच्छता, दायित्व, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शक व […]

Posted inखालापूरखोपोलीताज्या बातम्यापेण

खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी

शुक्रवारी पहाटे अज्ञात व्यक्तींच्या गटाने एका तासाच्या आत खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी केली. या प्रकरणाचा तपास करताना खालापूर पोलिसांनी सांगितले की, ३० लाख रुपये असलेले दुसरे एटीएम तोडण्याचा प्रयत्न या चोरांनी केला पण तो अयशस्वी झाला. शुक्रवारी पहाटे अडीच ते साडेतीन या दरम्यान पेन-खोपोली रोडलगतच्या गोरथन बुद्रुक गावात ही चोरी झाली. त्याचप्रकारे […]