Posted inताज्या बातम्यारायगड

आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश

खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करीत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली आहे. सरकारने काढलेल्या परिपत्रका नुसार खासगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूटमार सुरू असून लेखा परीक्षण समितीच्या अहवालाप्रमाणे त्या हॉस्पिटलवर तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहेत. खासगी […]

Posted inअलिबागताज्या बातम्यामुरुडश्रीवर्धन

मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका बसला असून, मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यामुळे सुमारे ३०० बोटी मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरात आसरा घेण्यास आल्या आहेत. यामध्ये स्थानिक तसेच परराज्यांतील बोटींचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस पडणारा पाऊस आणि वादळी पावसाचा फटका मच्छीमारांना बसला असून, आगरदांडा बंदरात मुरूड व श्रीवर्धन तालुक्यासह रत्नागिरी तसेच गुजरात, […]

Posted inताज्या बातम्यारायगड

शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

जिल्ह्यामध्ये सर्व खाजगी व शासकीय कोविड-19 रुग्णालयांमध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेड व आय.सी.यू. बेडबाबत सनियंत्रण करण्यासाठी तहसिलदार कार्यालयामध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांसाठी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेड O2 व आय.सी.यू. बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित […]

Posted inखालापूरखोपोलीताज्या बातम्यापनवेल

मोरबे धरणात सापडला महिलेचा मृतदेह

पनवेल तालुक्यातील मोरबे धरणात बुधवारी जवळपास ३० वर्ष वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. शरीर लोखंडी तारा आणि दोरीने डोक्यापासून पायापर्यंत बांधलेले होते. धरणात शरीर पूर्णपणे बुडविण्यासाठी शरीरावर सिमेंट ब्लॉक बांधलेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे शरीरावर फुगलेला असल्याने तो तरंगत येऊन धरणाच्या भिंतीजवळ अडला. पोलिसांना केवळ शरीरावर बांधलेल्या तारा कापण्यास सुमारे ४५ मिनिटे लागली. “मृत्यूचे […]

Posted inताज्या बातम्यारायगड

केंद्र शासनाच्या पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत गरजू पथविक्रेत्यांना कर्ज वाटप

केंद्र शासनाच्या पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत गरजू पथविक्रेत्यांना कर्ज वाटप अधिकाधिक पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन कोविड-19 महामारी व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देशातील अनेक लोकांचे लहान-मोठे उद्योग बंद पडले.  त्यात रस्त्यांवर दुकान लावून (पथविक्रेते) त्यावर उपजीविका करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा लोकांकरिता केंद्र शासनाने पीएम-स्वनिधी योजना सुरु केली आहे. जेणेकरून […]

Posted inरायगड

ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर

रायगड जिल्ह्यामधील 15 तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे नवीन रास्त भाव शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करण्याकरिता जाहीरनामा काढणे व प्रसिद्ध करणे (स्थगनादेश नसल्यास) दि. 14 सप्टेंबर 2020.  संस्थांना अर्ज करण्याकरिता मुदत (30 दिवस) दि. 14 सप्टेंबर ते दि. 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत.  नवीन दुकानाकरिता […]

Posted inउरण

विंधणे गावात कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव

दिवसेंदिवस उरण तालुक्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढतच आहे. याचाच फार मोठा परिमाण विंधणे गावावर ही झालेला आहे. विंधणे गावात शासकीय आकडेवारीनुसार दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चाललेली असताना शासनाने/ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. विंधणे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असल्यामुळे गाव कोरोना मुक्त करण्यासाठी गावात […]

Posted inरोहा

रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

आ. अनिकेत तटकरेंच्या हस्ते लोकार्पण रोहा : रोहे तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहाला सद्य परिस्थितीत असलेली गरज लक्षात घेता रविवारी सायंकाळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे दोन संच भेट देण्यात आले सदर संचांचे आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे विद्यमान प्रेसिडेंट महेंद्र दिवेकर […]

Posted inनवी मुंबईपनवेल

खारघरमध्ये एटीएम तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अल्पवयीन मुलाला अटक

शुक्रवारी सकाळी पैसे चोरी करण्यासाठी एटीएम तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी एका १४ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलास पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समितीसमोर हजर केले जाईल. एटीएम कियोस्क तोडण्याची मुलाची कृती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंदली गेली. पोलिसांनी सांगितले की, पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान पनवेल येथील अल्पवयीन मुलाने खारघरातील सेक्टर २१ मधील यूको बँक […]

Posted inनवी मुंबईपनवेल

तळोजा एमआयडीसीतील ८०४ उदयोग पुन्हा सुरु; लाखो कामगार आनंदित

गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या तळोजा एमआयडीसीतील सुमारे ८०४ उद्योगांना राज्य सरकारकडून गुरुवारपासून कामकाज सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण तळोजा एमआयडीसी पट्टा आता प्रथमच कार्यान्वित झाला आहे. येथे काम करणाऱ्या लाखो कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तळोजा औद्योगिक पट्ट्यात एकूण ९७३ उद्योग आहेत. त्यापैकी १६९ कार्यरत होते कारण त्यांनी आवश्यक वस्तू […]