Posted inनवी मुंबईपनवेल

ई-सिम फसवणूकीत महिलेचा १.४ लाख रुपयांचा तोटा

खारघर येथील ४७ वर्षीय वृद्ध इंटीरियर डिझाइनरला ऑनलाईन फसवणूकदाराने १.४६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकदाराने मोबाईल सेवा कंपनीचे प्रतिनिधी म्हणून मोबाईलवर संपर्क साधला. कॉलरने सांगितले की कंपनी ग्राहकांसाठी ई-सिम कार्ड सक्रिय करीत आहे आणि सेल्युलर नेटवर्क कंपनीच्या केंद्रीय हेल्पलाइनवरुन तिला एक संदेश पाठविला आहे आणि ई-सिम पडताळणीसाठी मेसेज मधला क्रमांक (OTP) सामायिक करण्यास सांगितले. […]

Posted inरोहा

जय गणेश मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

रोहा (निखिल दाते): रोहे तालुक्यातील मानाचा गणेशोत्सव म्हणुन ओळख असणाऱ्या जय गणेश मित्र मंडळाच्या गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास रोहेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरात 40 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. जय गणेश मित्रमंडळाने रक्ताची नितांत गरज असतांना मंडळाचे लोकप्रिय अध्यक्ष श्री. नितीन माने यांच्या नेत्रुत्वाखाली आयोजित केलेल्या या उपक्रमाचे रोहे तालुक्यातील […]

Posted inनवी मुंबईपनवेल

पनवेलमध्ये सहा मोबाइल टीमने सुरू केल्या अँटीजेन चाचण्या

पीसीएमसीने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या उच्च जोखमीच्या संपर्कांसाठी त्यांच्या दाराजवळ विनामूल्य अँटीजेन चाचण्या घेण्यासाठी डॉक्टर, लॅब तंत्रज्ञ आणि सहाय्यकांचा समावेश करून सहा मोबाइल पथकांची नेमणूक केली आहे. २१ ऑगस्ट रोजी साठा संपल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात पीसीएमसीने आणखी १५,००० अँटीजेन किट खरेदी केली आणि पुन्हा चाचण्या सुरू केल्या. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले की, गरजूंसाठी मोफत अँटीजेन […]

Posted inउरण

महावितरण – गणपती मध्ये पण विंधणे ग्रामपंचायत दररोज अंधारात; नागरिक संतप्त

उरण गॅस टरबाइन पासुन जवळच असलेली विधंणे ग्रामपंचायत दररोज अंधारात; नागरीक संतप्त उरण पुर्व विभागात असलेल्या विधंणे ग्रुप ग्राम पंचायत मधील गावांना तालूक्यात काेठेही फाॅल्ट असलातरी अंधारात रहावे लागते. महावितरण चा अनागाेंदी कारभार आणि अपूऱ्या डागडूजी मूळे पावसाळ्यात सारखा विजपुरवठा खंडीत होत असतो. त्यात महावितरण च्या विजपुरवठा लाईनवर विधंणे ग्रुप ग्रामपंचायत शेवटची असल्याने कोठेही फाॅल्ट […]

Posted inरोहा

रोह्यात फोटो विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती अध्यक्षा कु. रुचिका राजेंद्र जैन यांचा पुढाकार, रोह्यात फोटो विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन रोहा (निखिल दाते): रोहे शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या कार्यक्षम अध्यक्षा, सातत्याने नवीन संकल्पना राबवणाऱ्या कु. रुचिका राजेंद्र जैन यांच्या संकल्पनेतून रोह्यात फोटो विथ बाप्पा या अनोख्या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक  गणेशभक्त हा बाप्पासोबत स्वतः चे […]

Posted inनवी मुंबईपनवेल

पनवेलला अँटीजेन टेस्ट किटचा तुटवडा; स्थानिक संतप्त

रॅपिड अँटीजेन चाचण्या वाढविण्याच्या कारणास्तव, महानगरपालिकेचे एका महिन्यात १५,००० अँटीजेन टेस्ट किट संपले पनवेलमधील सार्वजनिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन दिवसांपासून रॅपिड अँटीजेन टेस्ट किट ची कमतरता आहे. चाचणीसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने रुग्ण व त्यांचे कुटुंबीय नाराज आहेत. नागरी संस्थेने साधारण एक महिन्यापूर्वी प्रतिजैविक चाचणी सुरू केली होती, परंतु स्टॉक संपला. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, […]

Posted inरायगडरोहा

जय गणेश मित्र मंडळातर्फे २९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

रोहा (निखिल दाते ): रोहे तालुक्यातील मानाच्या गणेशउत्सवांपैकी एक असलेल्या भुवनेश्वर निरलॉन वसाहतीतील जय गणेश मित्र मंडळातर्फे शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे लोकप्रिय अध्यक्ष नितीन माने यांनी दिली. या मंडळाच्या गणेशोत्सवाचे हे २० वे वर्ष असून या वर्षी कोव्हिडमुळे हा उत्सव साधेपणाने होत असला तरी रक्तदान शिबिरासारख्या गरजेच्या […]

Posted inरोहा

शासनाच्या विविध लोकप्रिय योजनांच्या जनजागृतीसाठी सुराज्यचे विशेष अभियान

रोहा(निखिल दाते): रायगड जिल्ह्यातील आदर्श युवा मंडळ हा प्रशासनाचा बहुमान  प्राप्त केलेले सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान सणांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित असते. कोरोनाच्या काळात लॉकडॉऊन व त्यात सामान्य माणसाना हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च हा न परवडणारा आहे. भारत सरकारची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थातच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५ लाखांचा विमा तसेच महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत […]

Posted inरोहा

संध्या दिवकर यांच्या मराठी गजल मुशायरातील प्रभावी सादरीकरणाचे राज्यस्तरावर कौतुक

दिग्गजांकडुन कौतुकाची थाप रोहा: रोहे शहरातील प्रतिभासंपन्न साहित्यिक, वैशिष्ठ्यपुर्ण लेखनशैली व बहारदार सादरीकरणासाठी संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित असलेल्या सौ. संध्या विजय दिवकर यांच्या मराठी गजल मुशायरा मधील सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक झाले असून राज्यस्तरावरील साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळींकडून त्यांना कौतुकांची थाप मिळाली आहे. साहीत्यानंद प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार विजय वडवेराव यांच्या पुढाकाराने 25 ऑगस्ट […]

Posted inरोहा

भुवनेश्वरच्या राजाचे यंदाचे 20 वे वर्ष; कोरोनामुक्तीसाठी गणरायाच्या चरणी साकडे

रोहा: रोहे तालुक्यातील मानाच्या गणपतींपैकी समजल्या जाणाऱ्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर येथील भुवनेश्वरच्या राजाचे हे 20 वे वर्ष असून या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रशासनाचे प्रचलित नियम व अटींचे पालन करुन या वर्षीच्या उत्सवाचे नियोजन केले असल्याची माहीती मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष श्री. नितीन माने यांनी दिली. धाटाव औद्योगिक वसाहतीतील नामांकित व्ही बेल्ट बनवणारी कंपनी असलेल्या निरलॉन […]