Posted inरोहा

‘अंशुल च्या राजाकडे’ व्यवस्थापन व कामगारांचे कोरोनामुक्तीसाठी साकडे

रोहा(निखिल दाते) : धाटाव औद्योगिक वसाहतीतील नामांकित अंशुल स्पेशालटी मोल्युक्युलस या कंपनीच्या आवारात असलेल्या श्री गणेश मंदिरात  गेली अनेक वर्षे गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येतो या वर्षी कंपनी व्यवस्थापन व कामगार बांधवांकडून देशावर, राज्यावर व रोहे तालुक्यावर आलेले कोरोनारुपी संकट लवकर दूर व्हावे यासाठी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली . […]

Posted inनवी मुंबईपनवेल

तळोजामध्ये महिलेची तिच्या घरात गळा कापून हत्या

तळोजामध्ये महिलेची तिच्या घरात गळा कापून हत्या सोमवारी अज्ञात व्यक्तीने ४५ वर्षीय महिलेची तिच्या अपार्टमेंटमधील घरात घुसून गळा कापून हत्या केली. पोलिसांना असा संशय आहे की तिच्या ओळखीच्या व्यक्तीने महिलेची हत्या केली असावी. “तिचा मृतदेह स्वयंपाकघरात सापडला. जखमांच्या आधारे तिचा गळा धारदार शस्त्राने कापला होता”, अशी माहिती तळोजा पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी दिली. […]

Posted inउरणनवी मुंबई

उरण जवळ ओएनजीसी ची पाईपलाईन फुटली; निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला

उरण जवळ ओएनजीसी ची पाईपलाईन फुटली; लगेच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला उरण मधील पिरवाडी समुद्र किनाऱ्याजवळ गळती झाल्याने मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहून गेले. ओएनजीसीमध्ये बॉम्बेहाय येथून कच्चे तेल वाहून आणणाऱ्या तेल वाहिनीला पिरवाडी किनाऱ्याजवळ गळती झाल्याने मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहून गेले. रविवारी रात्रीच्या वेळी ही गळती सूरू झाली असून अवजड वाहन या […]

Posted inमहाडरायगड

महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, १०० लोक अडकल्याची भीती

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत जवळपास ४५ कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. महाड शहरातील काजळ पुरा परिसरात ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे ७ वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या ५ मजली इमारतीत साधारण ५० फ्लॅट होते असून […]

Posted inनवी मुंबईपनवेल

मंदिरातुन दानपेट्या आणि दुचाकी चोरण्यासाठी पनवेल येथून तिघांना अटक

लॉकडाऊन दरम्यान कमीतकमी तीन मंदिरांच्या दानपेट्या आणि दुचाकी चोरल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात खांदेश्वर पोलिसांनी पनवेलमधील तीन जणांना अटक केली. आरोपींना चोरीच्या चार दुचाकी आणि दानपेटीसह पकडण्यात आले असून ८५,५०० रुपयांची नकद जप्त करण्यात अली आहे. खान्देश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण (वय २६), सूरज देवरे (वय २०) आणि आकाश गाडे (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत. […]

Posted inरोहा

रोह्याच्या राजाचे यंदाचे 99 वे वर्ष; एक गाव एक गणेशोत्सव परंपरेचे अविरतपणे जतन

रोहे शहराचे वैभव असलेल्या, लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेली एक गाव एक गणेशोत्सव ही प्रथा गेली 98 वर्ष प्रयत्नपूर्वक जतन करणारा रोह्याचा राजा हा रायगड जिल्ह्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असून या रोह्याच्या राजाचा उत्सव  या वर्षी कोरोनाच्या काळात साधेपणाने पण अत्यंत भक्तिभावाने सर्व प्रशासकिय नियमांचे पालन करुन दरवर्षीप्रमाणेच रोह्याची साहीत्य पंढरी असलेल्या भाटे सार्वजनिक वाचनालयात साजरा […]

Posted inपेण

पेणमध्ये फक्त १०० कोटींची उलाढाल, गणपती मूर्तींची निर्यात मंदावली

पेण हे गणपतीच्या सुबक मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र यंदाच्या कोरोना ह्या जागतिक विपत्तीमुळे बाजारात मंदी असून याचा परिणाम गणपती मूर्तींच्या व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आहे. घाऊक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या तसेच परदेशात निर्यात होणाऱ्या गणपतीच्या मूर्तींची मागणी घटल्याने जवळजवळ ५0 कोटी रुपयांचा आर्थिक फटका गणेश मूर्ती व्यवसायाला बसला आहे. दरवर्षी जवळजवळ १५0 कोटी एवढी होणारी […]

Posted inउरणनवी मुंबईपनवेल

सिडकोचे एम.डी लोकेश चंद्र यांची अचानक बदली

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची अचानक बदली करण्यात आली असून बदली त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी ह्यांची सिडकोच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) पदी नियुक्ती झाली आहे. तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मंत्रालयात बढती देण्यात आल्यावर त्यांच्या जागी लोकेश चंद्र […]

Posted inअलिबागमुंबई

मुंबई ते अलिबाग रो-रो बोट सेवा पुन्हा सुरू

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अलिबागला जाण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांसाठी सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि अलिबागदरम्यान रो-रो बोट सेवा २० ऑगस्टपासून पुन्हा सुरू होईल. ही रो-रो सेवा भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावर सुरू होईल. यामुळे गणेशोत्सवाच्या वेळी भाविकांना मदत होईल. यासाठी ११ दिवसाचा वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर […]

Posted inकर्जत

लॉकडाउन नंतर माथेरान बदलले जाईल, नगराध्यक्ष

लॉकडाउन नंतर माथेरान बदलले जाईल, नगराध्यक्ष पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि रस्ते सुधारण्यासाठी सरंक्षक भिंती बांधण्याच्या प्रकल्पाबरोबरच माथेरानमध्ये दहा जागांचा विकास व सुशोभित करण्यासाठी कालानुरूप प्रकल्प सुरू करण्यात आली आहेत. माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा प्रसाद सावंत यांनी सांगितले की, माथेरान टेकडी लॉकडाउन नंतर पूर्णपणे वेगळी जागा होईल. दहा पर्यटक स्थळांचा विकास व सुशोभिकरण, फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प पुढे नेण्यासाठी […]