Posted inनवी मुंबई

सिडकोचे एम.डी लोकेश चंद्र यांची अचानक बदली

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची अचानक बदली करण्यात आली असून बदली त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी ह्यांची सिडकोच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) पदी नियुक्ती झाली आहे. तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मंत्रालयात बढती देण्यात आल्यावर त्यांच्या जागी लोकेश चंद्र […]

Posted inउरण

प्रामाणिक सफाई कामगार आणि त्याच्या पत्नीने परत केले ३ लाख रुपयांच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह हरवलेली पर्स

नगर परिषदेशी संलग्न प्रामाणिक सफाई कामगार सिद्धार्थ कसारे आणि त्यांची पत्नी स्मिता यांनी महागड्या सोन्याच्या मंगळसूत्रासह हरवलेला पर्स परतवल्यावर त्यांचे कौतुक केले जात आहे. “मला नुकतीच उरण शहरातील माझ्या घराजवळ एक पर्स पडलेली आढळली. ती माझ्या पत्नीच्या पर्स सारखी दिसत होती म्हणून मी ते उचलले आणि नंतर माझ्या पत्नीला विचारले की चुकून तिची पर्स हरवली […]

Posted inउरणनवी मुंबई

लॉकडाऊन दरम्यान खारकोपर-उरण १४ किमी मार्गाचे काम वेगवान झाले

लॉकडाऊन व अनलॉक कालावधी दरम्यान मध्य रेल्वेने (CR) वेगाने सुरू केलेल्या मोठ्या इंफ्रा कामांपैकी बेलापूर-सीवूड्स – उरण प्रकल्पाच्या उर्वरित १४.६ किमी खारकोपर – उरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी सीआरचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार म्हणाले: “या संपूर्ण मार्गाच्या कामकाजामुळे मुंबई – उरणमधील अंतर जवळपास ४० ते ५० टक्के कमी […]

Posted inउरण

उरण सामाजिक संस्था आणि तहसिलदार उरण यांच्यात सकारात्मक चर्चा

तहसिलदार उरण यांच्या अध्यक्षतेखाली उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आज रुग्णालयसंदर्भात बैठक संपन्न झाली. बैठक सकारात्मक असून मा. तहसिलदार यांनी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयाच्या पाठपुराव्यासाठी दर महिन्याला एक दोन वेळा मंत्रालयात येण्याची तयारी दाखविली आहे. बैठकीत चर्चा झालेले मुद्दे पुढीलप्रमाणे. मा तहसिलदार यांनी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयाच्या पाठपुराव्यासाठी दर महिन्याला एक दोन वेळा मंत्रालयात येण्याची तयारी […]

Posted inउरण

उरण मध्ये अद्यावत रुग्णालयासाठी उरण सामाजिक संस्था १५ ऑगस्ट रोजी करणार आंदोलन

उरण मध्ये सुसज्य आणि अद्यावत रुग्णालय उभारले जावे यासाठी उरण सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहे. त्यामुळेच उरण साठी १०० खाटांच्या रुग्णालयासाठी भूखंड सुद्धा मंजूर झाला आहे. परंतु मागील ५ वर्षात तेथे कोणतेही काम झाले नाही. ह्यासाठी उरण सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली. आता कोरोनाच्या संकटात उरणमध्ये अद्यावत […]

Posted inउरण

जेएनपीटी बंदरातून १००० कोटी रुपयांची १९१ किलो हेरॉईन जप्त

जेएनपीटी बंदरातून १००० कोटी रुपयांची १९१ किलो हेरॉईन जप्त महसूल इंटेलिजन्स संस्थेच्या मुंबई युनिटने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिबंधित जवळजवळ १००० कोटी रुपये किमतीचे १९१ किलो हेरॉईन उरणच्या न्हावा शेवा बंदरातुन जप्त करण्यात केले आहे. जप्त करण्यात आलेला हेरॉईन अफगाणिस्तान वरून तस्करी केल्याचा समजतंय. डीआरआयने मुंबईत दोन जणांना अटक केली ज्यांनी समुद्रमार्गे येणाऱ्या कंटेनरला सीमाशुल्क देऊन सीमाशुल्क […]

Posted inउरण

वादळी वाऱ्याचा जेएनपीटीला दणका, ३ क्रेन कोलमडून पडल्या

JNPT Crane Crash – सोसाट्याचा वारा आणि पाऊसामुळे JNPT पोर्ट मधील ३ क्रेन कोलमडून पडल्या आहेत. मुंबई, कोकण किनारपट्टीला आज आणि उद्यासाठी हवामान खात्याने वादळी पावसाचा इशारा दिला असून काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस चालू आहे. आज दुपारपासून चालू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे JNPT मधील जहाजातून कंटेनर उतरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ३ क्रेन कोलमडून पडल्या आहेत. सुदैवाने कामकाज […]

Posted inउरणनवी मुंबई

उरणमधील नौदल स्टेशनवर सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडच्या पहिल्या २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाचे (2 MW Solar Power Plant) उरणमध्ये उद्घाटन झाले. भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडच्या पहिल्या दोन मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाचे नवी मुंबईतील नौदल स्थानकात ई-उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. सोमवारी या प्रकल्पाचे उद्घाटन व्हाईस एडमिरल अजित कुमार, कमांडिंग-इन चीफ-चीफ-वेस्टर्न […]

Posted inनवी मुंबई

NMMC Recruitment Form | नवी मुंबई महानगरपालिका भरती आवेदन फॉर्म

NMMC Recruitment Form | नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंदात्मक उपाययोजना करण्याकरीता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कामकारण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमाह ठोक मानधनावर कंत्राटी पद्धतीने सेवा घेण्याबाबत ऑनलाइन पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर नोंद करावी. जाहिरात – COVID-19 प्रतिबंध अंतर्गत कंत्राटी (करार) पद्धतीने वैद्यकीय /निम वैद्यकीय मनुष्यबळाच्या सेवा घेणेबाबतची […]

Posted inउरण

उरणमध्ये लावारीस गुरांची चोरी

उरण बोरी रोड वर एक सिल्वर कलरची टवेरा गाडी रस्त्यावर बसलेल्या गाई व वासरांना गुंगी चे औषध किंवा इंजेक्शन देऊन टवेरा सारख्या गाडीमध्ये भरून घेऊन जात असतांना तेथील स्थानिक रहिवाशी दाम्पत्याने हा प्रकार रोखण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते निष्फळ ठरले.