Posted inताज्या बातम्याराज्य

MTDC Resort चे होणार खासगीकरण, हे रिसॉर्ट्स आहेत पहिल्या टप्प्यात

राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी ठाकरे सरकारने MTDC Resort अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, तर रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्गातील मिठबाव येथील रिसॉर्टचे खासगीकरण करण्यात येणार आहे. हे रिसॉर्ट ज्या संस्था चालवायला घेतील घेतील त्यांना पर्यटन धोरणानुसार विशिष्ट सवलतीही देण्यात येणार […]

Posted inताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

गेट वे ऑफ इंडियाच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र सरकारची योजना

गेट वे ऑफ इंडिया – देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक नव्याने उभारण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे. त्याच्या अपग्रेडेशन आणि नूतनीकरणाच्या योजनेत, राज्य त्या ठिकाणी देशाच्या आर्थिक राजधानीची ओळख देऊ इच्छित आहे. संवर्धनाचे आर्किटेक्ट आभा लांबा यांनी पुनर्वसनासाठी तीन प्रस्ताव तयार केले आहेत. या दुरुस्तीमध्ये स्मारकाचे संवर्धन, पर्यटकांसाठी सुविधा, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा श्रेणीसुधारणा यांचा […]

Posted inताज्या बातम्यादेश

खांदा कॉलनी येथील सीकेटी कॉलेज कडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे हाइटगेज पडले

खांदा कॉलनी येथील सीकेटी कॉलेज कडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे हाइटगेज पडले आहेत. महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक त्या ठिकाणी पोहोचले असून त्या ठिकाणचा रस्ता दक्षता म्हणून बंद करण्यात आला आहे. पनवेल मधून खांदा कॉलनी आणि सीकेटी महाविद्यलया कडे जाणाऱ्यांसाठी हा रास्ता सोयीचा आहे परंतु महाविद्यालये सध्या बंद असल्याने विद्यार्थाना ह्याचा त्रास होणार नाही परंतु येथून प्रवास करणाऱ्या […]

Posted inखालापूरखोपोलीताज्या बातम्यापेण

खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी

शुक्रवारी पहाटे अज्ञात व्यक्तींच्या गटाने एका तासाच्या आत खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी केली. या प्रकरणाचा तपास करताना खालापूर पोलिसांनी सांगितले की, ३० लाख रुपये असलेले दुसरे एटीएम तोडण्याचा प्रयत्न या चोरांनी केला पण तो अयशस्वी झाला. शुक्रवारी पहाटे अडीच ते साडेतीन या दरम्यान पेन-खोपोली रोडलगतच्या गोरथन बुद्रुक गावात ही चोरी झाली. त्याचप्रकारे […]

Posted inताज्या बातम्यामुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल अत्यावश्यक सेवेसाठी आणि काही प्रमाणात बँक कर्मचाऱ्यांसाठी शासनाने रेल्वे सेवा सुरू केली आहे. परंतु मुंबई उपनगरात मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे ठाणे-मुंबई मार्गावर लोकल सेवा बंद करण्यात आली. सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंत केले. मध्य रेल्वेने सकाळी त्यासंदर्भात ट्विट करून प्रवाशांना माहिती देऊन […]

Posted inताज्या बातम्यारायगड

शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

जिल्ह्यामध्ये सर्व खाजगी व शासकीय कोविड-19 रुग्णालयांमध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेड व आय.सी.यू. बेडबाबत सनियंत्रण करण्यासाठी तहसिलदार कार्यालयामध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांसाठी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेड O2 व आय.सी.यू. बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित […]

Posted inताज्या बातम्याराज्य

एसटी बस आता पूर्ण आसन क्षमतेने धावणार

कोरोनामुळे संकटांत सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस आता पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे. उद्यापासून ( 18 सप्टेंबर) पूर्ण आसन प्रवासी वाहतूक करण्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. पण प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशानं मास्क लावणे, सॅनिटायझ करणे बंधनकारक असणार आहे. एसटीने या आधी 50 टक्के प्रवासी वाहतूक केली जात होती. आता पूर्ण […]

Posted inखालापूरखोपोलीताज्या बातम्यापनवेल

मोरबे धरणात सापडला महिलेचा मृतदेह

पनवेल तालुक्यातील मोरबे धरणात बुधवारी जवळपास ३० वर्ष वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. शरीर लोखंडी तारा आणि दोरीने डोक्यापासून पायापर्यंत बांधलेले होते. धरणात शरीर पूर्णपणे बुडविण्यासाठी शरीरावर सिमेंट ब्लॉक बांधलेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे शरीरावर फुगलेला असल्याने तो तरंगत येऊन धरणाच्या भिंतीजवळ अडला. पोलिसांना केवळ शरीरावर बांधलेल्या तारा कापण्यास सुमारे ४५ मिनिटे लागली. “मृत्यूचे […]

Posted inताज्या बातम्यारायगड

केंद्र शासनाच्या पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत गरजू पथविक्रेत्यांना कर्ज वाटप

केंद्र शासनाच्या पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत गरजू पथविक्रेत्यांना कर्ज वाटप अधिकाधिक पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन कोविड-19 महामारी व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देशातील अनेक लोकांचे लहान-मोठे उद्योग बंद पडले.  त्यात रस्त्यांवर दुकान लावून (पथविक्रेते) त्यावर उपजीविका करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा लोकांकरिता केंद्र शासनाने पीएम-स्वनिधी योजना सुरु केली आहे. जेणेकरून […]

Posted inरायगड

ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर

रायगड जिल्ह्यामधील 15 तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे नवीन रास्त भाव शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करण्याकरिता जाहीरनामा काढणे व प्रसिद्ध करणे (स्थगनादेश नसल्यास) दि. 14 सप्टेंबर 2020.  संस्थांना अर्ज करण्याकरिता मुदत (30 दिवस) दि. 14 सप्टेंबर ते दि. 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत.  नवीन दुकानाकरिता […]