Posted inपनवेल

पनवेल – 112 घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर तुरूंगात

२०१७ साली घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल कोर्टाने नवी मुंबईतील बिल्डरला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. बिल्डरला सर्व घर खरेदीदारांना 6..5 टक्के व्याजासह बुकिंगची रक्कम परत करण्यास सांगितले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Posted inमुंबई

आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकलची मर्यादित सेवा सुरु

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मुंबईत लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज 15 जून पहाटेपासून मध्य आणि पश्चिम मार्गावर ही लोकल सेवा सुरु करण्यात आली. दोन्ही मार्गावर तब्बल 346 लोकल फेऱ्या केल्या जाणार आहेत.

Posted inपनवेल

कामोठे : महिलेने ऑनलाइन फसवणूकीमध्ये गमावले १ लाख ५ हजार

कामोठे पोलिसांनी बुधवारी एका अनोळखी व्यक्तीवर १ लाख ५ हजार रुपयांची महिलेस ऑनलाइन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. वारंवार वीज खंडित होत असल्याकारणाने महिला सातारा येथील आपल्या गावी पॉवर बँक कुरियर करण्याचा प्रयत्न करीत होती. कुरिअर एजन्सी कर्मचारी म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने तिला तिच्या खात्यात ५ रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले, त्यानंतर तिने ५००० रुपये गमावले आणि थोड्याच वेळात अजून ५ ट्रँझॅकशनमध्ये एकूण १ लाख रुपये कमी झाले.

Posted inशेती

लॉकडाउनच्या अंधकारात कृषी क्षेत्र उज्वल आहे का?

कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे आणि लॉकडाऊनमुळे जीडीपीचे दर खाली आले आहेत. परंतु असे दिसते की कृषी क्षेत्र तुलनेने जास्त प्रभावित झालेले नाही . क्रिसिलच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की आर्थिक वर्ष २०२१ मध्ये या क्षेत्रात २.५% टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

Posted inदेश

येत्या चोवीस तासांत भारतभरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, आयएमडीने ३ राज्यांसाठी रेड अलर्ट बजावला

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) येत्या 24 तासांत देशातील कित्येक भागात मुसळधारपासून अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तेलंगणा, किनारी कर्नाटक, गोवा आणि कोकणात “लाल” इशारा दिला आहे.