उरणचा सेफ्टी झोन रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय 

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी देशाची पश्चिम समुद्री सीमा सुरक्षित करण्यासाठी उरण परिसरातल्या क्षस्त्रसाठा कोठाराचा सुरक्षा पट्टा  (सेफ्टी झोन) रद्द करू अशी घोषणा विधानसभेत केली . उरणचे स्थानिक आमदार मनोहर भोईर यांनी याबाबत सरकारचे लक्ष वेधले होते .या सुरक्षापट्ट्यात उरण
शहरासोबत केगाव ,म्हातवली नागाव रानवाडा व बोरी पाखाडी या गावातील नागरिक बेघर होणार होते त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे .
१९७० मध्ये नेव्हल अपार्टमेंट डेपोसाठी ह्या जमीनी संपादित करण्यात आल्या होत्या .करंजा येथे देशाचा संरक्षण दलातील मोठा साठा असलेला डेपो आहे.मात्र अशा डेपोजवळ नागरी वस्ती असणे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे तसेच हा सुरक्षेचा नियमही आहे.परंतु येथे नागरी वस्ती मोठ्याप्रमाणात असल्याकारणाने हा सुरक्षा पट्टारद्द करावा अशी राज्य सरकारची भूमिका आहे .त्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी प्राथमिक चर्चाही झाली .