एका दिवसात ३ ठिकाणी भूकंप…तिन्ही केंद्र एका सरळ रेषेत 

आज दुपारी १२:३०-१ च्या दरम्यान नेपाळ ला पुन्हा एकदा ७.४ तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले.भूकंपाचे केंद्र
नेपाळची राजधानी काठमांडू पासून ८२ किमी पूर्वेला चीनच्या सिमेजवळ जमिनीच्या १८.५ किमी खाली होते. आताच २५ एप्रिल २०१५  रोजी 7.८ तीव्रतेच्या झटक्यांनी नेपाळ मध्ये ८००० लोकांचा मृत्युला सामोरे जावे लागले होते.त्या संकटातून बाहेर पडण्याच्या अगोदरच पुन्हा एकदा नेपाळ हादरून गेले आहे.

नेपाळ बरोबरच अफगाणिस्तान  व इंडोनेशिया मध्ये सुद्धा भूकंपाचे झटके जाणवले
अफगाणिस्तानात  सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी ४.७  तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले . भूकंपाचा केंद्र हिंदू-कुश भागात ३० किमी जमिनीच्या खाली होता.
इंडोनेशिया मध्ये सकाळी ६ वाजून २७ मिन्तानी ५.१ तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले.