मुरूडच्या फणसाड अभयारण्यात बिबट्याचा सुळसुळाट
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्या शेजारील ग्रामस्थांना मागील काही दिवसात बिबट्याने चांगलेच भयभीत करून सोडले आहे. फणसाड अभयारण्याच्या ७० चौरस किमीच्या क्षेत्रात बिबट्या,कोल्हे,मगर ,तरस अशी बरीच जंगली श्वापद आढळतात.
मागील काही दिवसात येथे येणाऱ्या पर्याटकांची संख्या पण चांगलीच वाढली होती. परंतु वारंवार ग्रामस्थांच्या नजरेस पडणाऱ्या बिबट्या मुळे लोक भयभीत झाले आहेत आणि येथे येणारे पर्यटक पण कमी झाले आहेत. बिबट्याला जंगलात अन्न कमी पडत असल्याने त्याने आता गावातील पाळलेल्या जनावराना
फस्त कारायला सुरवात केली आहे. मुरुड तालुक्यातील वडघर गावातील गोठ्यात बंधेलेल्या चार बकऱ्या रात्री ३.३० वाजता बिबट्याने फरफटत नेवून फस्त केल्या. ह्या घटनेमुळे येथील जनता खूपच भयभीत झली आहे.