रेल्वेतून पडून एका व्यक्तीचा मृत्यु

 

पेण- दिलीप दळवी वय (58) वर्ष ह्यांचा रेल्वेतून पडून मृत्यु. दिलीप दळवी हे मांडवी एक्स्प्रेसने चिपळूण करिता प्रवास करत होते, परंतु रेल्वेत बसायला जागा नसल्या कारणाने ते दरवाजात बसले होते. यावेळी झोप लागली असता त्यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे ते रेल्वेतून खाली पडले. ही बाब त्यांच्यासोबत असलेल्या जितेंद्र दळवी यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना पेण येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले.