एनएच १७ मुंबई -गोवा महामार्गावर भीषण अपघातात २ ठार तर बरेच जखमीमुंबई -गोवा महामार्गावर आज सकाळी ५:१५ वाजता गॅस सिलेंडर वाहक ट्रक आणि स्टीलच्या सळया घेऊन जाणारा  ट्रक यांच्यामध्ये  पेण जवळील हमरापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात  बऱ्याच गॅस सिलेंडरचा विस्फोट झाला.ह्या विस्फोटात दोघांचा जागच मृत्यू झाला व ट्रक चालक गंभीर जखमी असून बरेच जण किरकोळ जखमी आहेत .५:१५ वाजल्या पासून हा महामार्ग बंद असल्यामुळे प्रवाशांना खोपोलीमार्गे हेलपाटा घेत प्रवास करावा लागला.