आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचून बांगलादेशविरुद्ध विजय साकारला. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना महेंद्रसिंग धोनीचा कूल फिनिशिंग टच पाहायला मिळाला.
आत्ता पर्यंत धोनीने तब्बल १२ सामने षटकार ठोकून जिंकवले आहेत. त्यामध्ये ९ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांचा समावेश आहे .
१)३१ जुलै २००५, डॅम्बुला वनडे प्रतिस्पर्धी संघःवेस्ट इंडीज गोलंदाजः जेरमैन लॉसन
२)४ सप्टेंबर २००५, हरारे वनडे प्रतिस्पर्धी संघः झिम्बाब्वे गोलंदाजः ब्लेसिंग महावीरे
३)३१ ऑक्टोबर २००५, जयपूर वनडे प्रतिस्पर्धी संघः श्रीलंका गोलंदाजः तिलकरत्ने दिलशान
४)३ नोव्हेंबर २००५, पुणे वनडे प्रतिस्पर्धी संघः श्रीलंका गोलंदाजः रसेल आरनॉल्ड
५)२० ऑक्टोबर २००७, मुंबई टी-२० प्रतिस्पर्धी संघः ऑस्ट्रेलिया गोलंदाजः ब्रेट ली
६)१५ नोव्हेंबर २००७, ग्वाल्हेर वनडे प्रतिस्पर्धी संघः पाकिस्तान गोलंदाजः सलमान बट्ट
७)२६ जून २००८, कराची वनडे प्रतिस्पर्धी संघः पाकिस्तान गोलंदाजः युनिस खान
८)२ एप्रिल २०११, मुंबई वनडे प्रतिस्पर्धी संघः श्रीलंका गोलंदाजः नुवान कुलशेखरा
९)११ जुलै २०१३, पोर्ट ऑफ स्पेन वनडे प्रतिस्पर्धी संघः श्रीलंका गोलंदाजः शमिंडा एरांगा
१०)२८ मार्च २०१४, ढाका टी-२० प्रतिस्पर्धी संघः बांगलादेश गोलंदाजः झिआउर रहमान
११)१४ मार्च २०१५, ऑकलंड वनडे प्रतिस्पर्धी संघः झिम्बाब्वे गोलंदाजः तिनाशे पान्यनगारा
१२)६ मार्च २०१६, मीरपूर टी-२० प्रतिस्पर्धी संघः बांगलादेश गोलंदाजः अल-अमिन हुसैन