नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या पर्वात पटना पायरटर्स ने यु मुंबाला  हरवून या मोसमातील विजेतेपद मिळवले.या मोसमातील अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा झाला आणि पटना ने मुंबई चा २८-३१ असा पराभव केला.

प्रो कबड्डीच्या या मोसमात रायगड करांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली ती म्हणजे आपल्या रायगडच्या  अनिल काशिनाथ पाटील याची जयपूर पिंक पँन्थर मध्ये झालेली निवड.अनिल पाटील हा मुळचा अलिबाग मधील पेझारी येथील रहिवासी आहे.आपल्या रायगडच्या मातीतच कबड्डी खेळण्याची सुरवात करत आता त्याने प्रो कबड्डी पर्यंत मजल मारली आहे.

या मोसमात अनिल पाटील याला जयपूर पिंक  पँन्थर मधून ५ सामने खेळण्याची संधी मिळाली.यात त्याने एकूण ८ गुणांची कमाई केली.विशेष बाब म्हणजे एका महत्वाच्या सामन्यात जयपूर पिंक  पँन्थर मधील आघाडीचे रेडर घायाळ असताना संपूर्ण रेडींगची जबाबदारी अनिल वर आली आणि अनिल ने देखील या सामन्यात ७ गुण मिळवून ही जबाबदारी चोख पणे बजावली .अनिल पाटील च्या या मोसमातील कामगिरी पाहता त्याला पुढील मोसमात टॉप ७ मध्ये समाविष्ट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .
अनिल पाटील यांस कबड्डी क्षेत्रातील पुढील प्रवासास ‘Times of Raigad ‘ च्या टीम तर्फे शुभेच्छा !