आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने श्रीलंकेला पाच विकेट राखून हरविले आणि अंतिम फेरीतील प्रवेश सर्वप्रथम नक्की केला. सलग तिसरा सामना जिंकून हॅट्ट्रिकसह भारताने आगेकूच केली. भारतासमोर १३९ धावांचे संघर्षपूर्ण आव्हान होते. विराट कोहलीच्या नाबाद ५६ आणि युवराज सिंगच्या ३५ धावांच्या बळावर भारताने श्रीलंकेस ५ गडी राखून पराभूत केले.
भारतीय कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीचे आमंत्रण दिले. धवन तंदुरुस्त झाल्यामुळे रहाणेला वगळण्यात आले, तर श्रीलंकेने बदल केला नाही. श्रीलंकेने भारतासमोर १३९ धावांचे आव्हान दिले.
कुलशेखराने भारताची सलामीची जोडी गारद केली. तंदुरुस्त झालेला धवन १ रन करून माघारी परतला . रोहित शर्मा स्लीपमध्ये झेल देऊन आउट झाला . कोहलीने या परिस्थितीत उपयुक्त भागीदारी रचल्या. रैनासह त्याने तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भर घातली. शनाकाने रैनाला आउट केले. विराट-युवराज यांनी ५१ धावांची भागीदारी केली . युवराजने या सामन्यात ३ षटकार लगावले. कोहलीने कुलशेखराला एका षटकात दोन चौकार मारले .
धावफलक
श्रीलंका – दिनेश चंडीमल झे. धोनी गो. नेहरा ४, तिलकरत्ने दिल्शान झे. अश्विन गो. पंड्या १८, शेहन जयसूर्या झे. धोनी गो. बुमराह ३, चमारा कपुगेदारा झे. पंड्या गो. बुमराह ३०, अँजेलो मॅथ्यूज त्रि. गो. पंड्या १८, मिलिंदा सिरीवर्धना झे. रैना गो. अश्विन २२, दासून शनाका धावचीत १, थिसारा परेरा यष्टिचीत धोनी गो. अश्विन १७, नुवान कुलशेखरा धावचीत १३, दुष्मंता चमीरा नाबाद २, अवांतर १०, एकूण २० षटकांत ९ बाद १३८
बाद क्रम – १-६, २-१५, ३-३१, ४-५७, ५-१००, ६-१०४, ७-१०५, ८-१२५, ९-१३८
गोलंदाजी – नेहरा ४-०-२३-१, बुमराह ४-०-२७-२, पंड्या ४-०-२६-२, युवराज सिंग १-०-३-०, रवींद्र जडेजा २-०-१९-०. आर. अश्विन ४-०-२६-२, सुरेश रैना १-०-९-०
भारत – शिखर धवन झे. चंडिमल गो. कुलशेखरा १, रोहित शर्मा झे. कपुगेदारा गो. कुलशेखरा १५, विराट कोहली नाबाद ५६, सुरेश रैना झे. कुलशेखरा गो. शनाका २५, युवराजसिंग झे. कुलशेखरा गो. परेरा ३५, हार्दिक पंड्या त्रि. गो. हेराथ २, धोनी नाबाद ७, अवांतर १, एकूण १९.२ षटकांत ५ बाद १४२
बाद क्रम – १-११, २-१६, ३-७०, ४-१२१, ५-१२५
गोलंदाजी – अँजेलो मॅथ्यूज ३-०-१६-०, नुवान कुलशेखरा ३-०-२१-२, थिसारा परेरा ४-०-३२-१, दुष्मंता चमीरा ४-०-२७-०, रंगणा हेराथ ३.२-०-२६-१, दासून शनाका १-०-७-१, मिलिंदा सिरीवर्धना १-०-१३-०