मुंबई – पुणे -एक्स्प्रेस वेवर मंगळवारी  पुण्याहून मुंबई कडे कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला खोपोली येथील  ढेकू गावा जवळ अचानक आग लागली .या अपघातात टँकरच्या केबिनला आग लागल्यामुळे चालकाचा आगीत होरपळून  दुर्दैवी मृत्यू झाला .अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले व आग आटोक्यात आणली त्यामुळे संपूर्ण टँकरने पेट न घेता मोठा अनर्थ टळला.

जळलेल्या टँकर च्या मालकाने दिलेल्या माहिती नुसार टँकर मध्ये चालक आणि क्लीनर असे दोघे होते . परंतु अपघात स्थळी केवळ एकच मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणातील गुंता वाढला आहे.सदरचा मृतदेह हा चालकाचा आहे की क्लीनरचा हे देखील अजून स्पष्ट झाले नाही.सदर अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.