Image not found

पीएनपी ग्रुपच्या मरिन फ्रंटीयर्सने नेदरलँड येथील खाजगी कंपनीसाठी ९० टक्के भारतीय बनावटीच्या भारतातील सर्वात मोठया अशा अ‍ॅल्युमिनीअमच्या व्यावसायीक बोटीची निमिर्ती करुन एक नवा विक्रम केला आहे. या बोटीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आले. यावेळी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, पीएनपी ग्रुपच्या संचालक नृपाल पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, आ. पंडीत पाटील, मरिन फ्रंटियर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दोशी, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी, संचालक रॉब बावरा, सुप्रिया पाटील, सुजय चौहान, चित्रलेखा पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.
अलिबाग तालुका, रायगड जिल्हा, नव्हे तर आख्या देशाला अभिमान वाटेल, अशी निर्मिती धरमतर येथील मरीन फ्रंटीयर्स या अल्युमिनीअम बोट बिल्डींग कंपनीने केली आहे. नेदरलँड नौदलासाठी तब्बल ३६ मीटर लांबीची गस्ती नौका मरीन फ्रंटीयर्स तर्फे तयार करण्यात आली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पहिलीच वेळ आली आहे, की एका भारतीय कंपनीनी दुस-या देशासाठी अशी नौका बनविली आहे. यामुळे पुन्हा एकदा अलिबाग जगाच्या नकाशावर पोहचले आहे.