बुधवार दि. 15 जुन रोजी दुपारी 4 वा धरमतर येथे झालेल्या इनोव्हा व विक्रम याच्यात झालेल्या जोरदार अपघातात  10 जण अत्यंत जखमी अवस्थेत सिव्हील हाॅस्पिटल येथे उपचारासाठी आणले आहेत तर काहीना पेण येथे सरकारी हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहेत. हा अपघात ऐवढया मोठ्या प्रमाणात होता की पहिल्यादा इनोव्हा व विक्रम यांच्यात समोरासमोर धड़क होवून  मागून येण्यारे तिन टूव्हील स्वार त्या इनोव्हा व विक्रम वर धड़कून त्यात दोघे जागीच ठार झाले.