खड्यांचे माहेरघर – शेकडो हजारो वर्षांपूर्वी एक प्रचंड उल्का पृथ्वीवर आदळल्यामुळे लोणार सरोवराची निर्मिती झाली. परन्तु ती उल्का एकटीच न पडता अनेक छोट्या उल्कांचा सर्व दिशेस वर्षाव होऊन हजारो खड्ड्यांची निर्मिती झाली. त्या खड्ड्यांमध्ये वसलेला जिल्हा म्हणजे रायगड आणि य़ा ऐतिहासिक खड्ड्यांचे जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे याची जाणीव येथील नागरिकांना झाली व त्यासाठी जिल्हा परिषदेची निर्मिती झाली. जिल्हा परिषदेने चोखपणे आपले कर्तव्य बजावले व जिल्ह्याच्या खड्ड्यांची कीर्ती जगभर पसरली. देशविदेशतुन लोक या खड्ड्यांना बघण्यासाठी येऊ लागले. त्यामुळे ऐतिहासिक पर्यटनस्थळ अशी जिल्ह्याची ख्याती झाली. हा जिल्हा ऐतिहासिक आहे असा काही लोकांचा भ्रम आहे. तो अर्थात चुकीचा आहे. येथील खड्डे हीच या जिल्ह्याची पेहचान आहे, शान आहे व जान आहे. त्यासाठी कितीतरी निष्पाप नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या खड्ड्यांमधून रस्ता बनवण्याचे अतिशय कठीण अशक्यप्राय असे काम सा. बा. वि. ने केल्यामुळे जिल्ह्याचा खरा आर्थिक विकास सुरु झाला. या रस्त्यांवर चालणारी वाहने जगात कुठेही चालू शकतील हे कळल्यामुळे वाहन निर्मितीने येथे जोर पकडला एवढेच नव्हे तर mercedes व audi सारख्या कंपन्यांनी त्यांच्या गाड्या या जिल्ह्यामधे मध्ये विकल्या व चालवल्या जातात याची आंतरराष्ट्रीय बातमी केली. चला या खड्ड्यांचे जतन करण्याचा संकल्प करुया… आपल्या जिल्ह्याची शान वाढवूया…!!!