व्हॉट्सअॅपला काही गोपनीयता सेटिंग्जमध्ये समस्यांचा सामना करावा लागला आहे ज्यामुळे एखादी व्यक्ती ऑनलाईन आहे की नाही हे यूजर पाहू शकत नाही. लास्ट सीन सेटिंग्ज देखील ‘नोबडी’ ला स्विच केले गेले आहे.
जगातील लोकप्रिय अॅप व्हॉट्सअॅप आपल्याला संदेशांची देवाणघेवाण करण्यास मदत करीत आहे. व्हॉट्सअॅप मेसेंजरला त्याच्या काही वैशिष्ट्यांसह अडचणी येत आहेत. वापरकर्ते एकमेकांचे अंतिम पाहिलेले किंवा व्यक्ती ऑनलाईन असल्याची कोणतीही चिन्हे पाहू शकत नाहीत. काल सायंकाळी या व्हॉट्सअॅप प्रायव्हसी सेटिंग्ज बदलण्यात आल्या आहेत.
डाऊन डिटेक्टरच्या मते, स्वतंत्र आउटेज मॉनिटरने व्हॉट्सअॅप डाऊन रिपोर्ट्समध्ये वाढ नोंदविली. ह्यामुळे अॅपचे बरेच वापरकर्ते नाराज आहेत आणि याबद्दल ट्विट करीत आहेत.
डाउन डिटेक्टर रिपोर्ट नुसार , ६७ टक्के वापरकर्त्यांनी त्यांच्या अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोनवर लास्ट सीन सेटिंग बदलल्याची समस्या नोंदविली आहे. तर, २६ टक्के वापरकर्त्यांनी कनेक्शन समस्येची तक्रार केली आहे. ६ टक्के लोकांना अॅपवर लॉग इन करण्यास समस्या असल्याचा समजतंय.
अॅप्लिकेशनच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये काहीतरी समस्या असून व्हॉट्सअॅपचे लास्ट सीन फीचर आता ‘नोबडी ‘ स्विच केले गेले आहे. वापरकर्त्यांसाठी त्रासदायक म्हणजे ते मागील सेटिंग्जवर परत जाऊ शकत नाहीत.