लॉकडाउनच्या अंधकारात कृषी क्षेत्र उज्वल आहे का?

कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे आणि लॉकडाऊनमुळे जीडीपीचे दर खाली आले आहेत. परंतु असे दिसते की कृषी क्षेत्र तुलनेने जास्त प्रभावित झालेले नाही . क्रिसिलच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की आर्थिक वर्ष २०२१ मध्ये या क्षेत्रात २.५% टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

महामारी मध्ये फळ, भाज्या अत्यंत उपयुक्त

कृषी क्षेत्राच्या उत्पादनामध्ये पीक, पशुधन, वनीकरण आणि मासेमारीच्या उत्पादनांचा समावेश आहे. कोरोनव्हायरसच्या उद्रेकामुळे प्रत्येक उप-गटावर भिन्न परिणाम झाला आणि एकूणच, लॉकडाऊन दरम्यान या क्षेत्राला मोठा धक्का बसलेला नाही.

लॉकडाऊन दरम्यान बागायती शेती आणि मासेमारी जास्त धोक्यात असून अहवालानुसार अन्नधान्य आणि पशुधन व्यवसायावर तुलनेने कमी परिणाम झाला आहे.

कृषी क्षेत्र हे त्याच्या भिन्न उत्पादनांमुळे संरक्षित आहे

साथीच्या आजारात अनेक कृषी उप-क्षेत्रावर परिणाम झाला असला तरी उत्पादन अनेक क्षेत्रात पसरलेले असल्यामुळे हा धक्का कमी होण्यास मदत झाली आहे.

शेती उत्पादनाचे घटक

कृषी क्षेत्राच्या एकूण मूल्यात पीकांचा मोठा वाटा असला तरी, पशुधनाचे मोठे योगदान आहे म्हणजेच कृषी क्षेत्र केवळ एका उत्पन्नाच्या स्त्रोतावर अवलंबून नाही. या वर्षांमध्ये पिकांच्या उत्पादनाचा परिणाम झाला आहे पशुधन पशुधन या क्षेत्राला चालना देण्यास मदत करत आहे.

कृषी व संबंधित व्यवसाय

अन्नधान्य आणि फलोत्पादन

पिके अन्नधान्य आणि फलोत्पादनात मोडले जाऊ शकतात. जरी फळबाग उत्पादन हे अन्नधान्याच्या उत्पादना एवढेच असले तरी फलोत्पादनामध्ये उत्पादनाचे मूल्य खूपच कमी असते.

अन्नधान्याच्या उत्पादनावर बागायती इतका फटका बसलेला नाही. अन्नधान्य साठवले जाऊ शकते परंतु फळ आणि भाज्या नाशवंत आहेत आणि ते जास्त काळ साठवले जाऊ शकत नाहीत.

एप्रिलमधील लॉकडाऊनमध्ये लोक दीर्घकाळ टिकणार्‍या खाद्यपदार्थाच्या खरेदीला प्राधान्य देत असल्याने फळे आणि भाज्यांचे घाऊक दर झपाट्याने खाली आले. विशेषत: धार्मिक स्थळांवर आणि कार्यक्रमांकरिता असणारी फुलांची मागणी सुद्धा कमी झाली आहे. बऱ्याच देशांनी लादलेल्या निर्बंधामुळे फळबागांच्या निर्यातीलाही मोठा फटका बसला आहे.

किमान आधारभूत किंमत आणि खरेदी सहाय्य यासारख्या सरकारी उपायांनी अन्नधान्यही चांगले संरक्षित आहे. तथापि, अलीकडील टोळ हल्लामुळे शेतीच्या उत्पादनास आणखी नुकसान होऊ शकते. रब्बी पिकांची काढणी झाली असून खरीप पेरणी अद्याप सुरू झालेली नसल्याने उरलेली पिके – मुख्यत: बागायतीवर टोळांचा परिणाम झाला आहे.

पशुधन

पशुधन उप-क्षेत्रामध्ये, उत्पादनात दुधाचे सर्वात मोठे योगदान असून मांसाचा सुद्धा मोठा वाटा आहे . रेस्टॉरंट्स आणि आतिथ्य उद्योग मंदावल्याने मागणी घटली असली तरी घरगुती मागणी स्थिर राहिली आहे. दुधाच्या मागणीत आलेल्या कमी मुले जास्तीचे दूध पावडरमध्ये रूपांतरित करून साठवले जाते.

गेल्या नोव्हेंबरमध्ये सहा वर्षांत प्रथमच महागाई दर दोन आकडी झाल्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा वाढ होण्यापूर्वी मार्चमध्ये अन्नधान्य महागाई किरकोळ खाली आली.महागाई दर मार्चमध्ये ८.८% पासून ते एप्रिलमध्ये १०.५% पर्यंत पोहोचले. भाजीपाला आणि डाळींच्या महागाईचा दर अनुक्रमे २३.६ आणि २२.८% झाला.

एप्रिलमध्ये घाऊक अन्नधान्य चलनवाढीचा दर मार्चमध्ये .५.५ टक्क्यांवरून घसरून ३.६ टक्क्यांवर आला आहे. तर किरकोळ अन्नधान्याच्या महागाईत वाढ झाली आहे. रब्बी हंगामातले चांगले उत्पादन आणि मान्सून वर आधारित खरीप हंगामातले उत्पादन महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल.

लॉकडाउनच्या अंधकारात कृषी क्षेत्र उज्वल

आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकलची मर्यादित सेवा सुरु