पुणे: बंदी असूनही मुळशीला सहलीला जाण्यासाठी पोलिसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ९० जणांवर गुन्हा दाखल केला.

मागील शनिवार व रविवारीपण अशा प्रकारचे 100 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आयपीसी कलम 188 अन्वये सर्व उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हा नोंदविला जात आहे.

पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे यांनी सांगितले की, “आम्ही भुगाव, माले गाव आणि लवासा रोड वर तीन चौक्या तयार केल्या आहेत.” “आम्ही पहाटेपासूनच सर्व वाहने तपासत होतो आणि जर लोक त्यांच्या प्रवासाची वैध कारणे देत नाहीत तर आम्ही त्यांना परत पाठवतो. त्यातील बहुतेक जण सहलीसाठी आले होते, ”ते म्हणाले.

सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य

“काहीजणांनी आपली शेते व फार्महाऊस असल्याचे सांगून मुळशीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांनाही परत पाठवले, ”लवटे म्हणाले.

ते म्हणाले, “आम्ही त्यांना नियमांचे उल्लंघन करून अनावश्यक अडचणीत येऊ नका असे सांगितले.

ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. “शनिवारी आम्ही 45 जणांवर आणि रविवारी बऱ्याचं जणांवर कारवाई केली. त्यामध्ये मास्क नसलेल्या लोकांचा समावेश आहे, असे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. ते म्हणाले, “काळजी न घेतल्यामुळे आम्ही 40 जणांवर गुन्हे दाखल केले”.