सुधागड आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आहे. आणि मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी नझाल्यामुळे सकाळी पाली, जांभुळपाड्यासह सुधागडात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत असून,आज दुपारी २ वाजता अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा वेग खूपच वाढला आहे.

खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभुळपाडा तसेच तामसोली पूल व सुधागडमधील अंबा नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप वाढला गेल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोना व अतिवृष्टीमुळे सर्व बाजारपेठा बंद असल्याचे दिसून येत आहे. पाली, पेडली व परळीत देखील पावसाचे परिणाम जास्त असल्यामुळे बाजारपेठेत खूप कमी प्रमाणात ग्राहक दिसून आले.

सलग दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखोल व खोलगट भागात खूप पाणी शिरले गेले आहे. तर नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. येथील गावांना जोडणाऱ्या पुलांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याचे दिसून आले. पाली बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. मात्र बसेस सुरू नसल्याने प्रवाशांना दरवर्षीप्रमाणे होणारा त्रास झाला नाही. आज दुपारी २ वाजता अंबा नदीने ८.०० मीटर ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग खूप वाढला आहे.नागोठणे बंधारा येथील नदीची धोका पातळी ९ मीटर इतकी आहे.

दरडग्रस्त व सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पोल्स, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

कांदिवलीजवळ वेस्टर्न एक्सप्रेसवे वर भूस्खलन; वाहतुकीवर परिणाम