रोहा (निखिल दाते ): रोहे तालुक्यातील मानाच्या गणेशउत्सवांपैकी एक असलेल्या भुवनेश्वर निरलॉन वसाहतीतील जय गणेश मित्र मंडळातर्फे शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे लोकप्रिय अध्यक्ष नितीन माने यांनी दिली.

या मंडळाच्या गणेशोत्सवाचे हे २० वे वर्ष असून या वर्षी कोव्हिडमुळे हा उत्सव साधेपणाने होत असला तरी रक्तदान शिबिरासारख्या गरजेच्या उपक्रमांचे आयोजन करुन जय गणेश मित्र  मंडळाने आदर्श घालून दिला आहे.

सध्या कोरोनामुळे राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी ७२७६४४४३७१ क्रमांकावर आधी नोंदणी करुन सहकार्य करावे असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

प्रशासनाच्या कोव्हिडसंबंधीच्या सर्व प्रचलित नियमांचे पालन करुन या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिबीर यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष नितीन माने यांच्या सक्षम नेत्रुत्वाखाली प्रविण शिर्के, दिपेश महाडीक, प्रथमेश घाग, महेश शिर्के, उमेश नाईक, सूचित पाटील आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

शासनाच्या विविध लोकप्रिय योजनांच्या जनजागृतीसाठी सुराज्यचे विशेष अभियान