उरण जवळ ओएनजीसी ची पाईपलाईन फुटली; लगेच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला

उरण मधील पिरवाडी समुद्र किनाऱ्याजवळ गळती झाल्याने मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहून गेले.

ओएनजीसीमध्ये बॉम्बेहाय येथून कच्चे तेल वाहून आणणाऱ्या तेल वाहिनीला पिरवाडी किनाऱ्याजवळ गळती झाल्याने मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहून गेले.

रविवारी रात्रीच्या वेळी ही गळती सूरू झाली असून अवजड वाहन या पाईपलाईनच्या वरून गेल्यामुळे ही पाईप लाईन फुटली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ओएनजीसी प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न सूरू करण्यात आले आहेत.

बॉम्बेहाय येथून समुद्रातून काढलेले कच्चे तेल पाईपलाईनद्वारे उरणच्या ओएनजीसी प्लान्ट मध्ये आणले जाते. यासाठी समुद्रातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. रविवारी या वाहिनीला पिरवाडी समुद्र किनाऱ्याजवळ गळती झाली.

ओएनजीसी प्रशासनाला या बाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने ही गळती थांबवण्याचे काम हाती घेतले परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहून गेले होते.

आज संध्याकाळपर्यंत ही गळती रोखण्याचे आणि पाईपलाईन दुरूस्त करण्याचे काम सूरू होते. गेल्या वर्षी 3 सप्टेंबरला ओएनजीसीच्या प्लान्टमधून नाफ्ताची गळतीमुळे झालेल्या अपघातात अनेक कामगार होरपळले होते. या आगीच्या घटनेला एक वर्ष पुर्ण होण्याच्या अगोदरच पुन्हा ओएनजीसीच्या पाईपलाईनमधून तेल गळती झाल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, १०० लोक अडकल्याची भीती

One reply on “उरण जवळ ओएनजीसी ची पाईपलाईन फुटली; निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला”