रोहा (निखिल दाते): रोहे तालुक्यातील मानाचा गणेशोत्सव म्हणुन ओळख असणाऱ्या जय गणेश मित्र मंडळाच्या गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास रोहेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरात 40 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

जय गणेश मित्रमंडळाने रक्ताची नितांत गरज असतांना मंडळाचे लोकप्रिय अध्यक्ष श्री. नितीन माने यांच्या नेत्रुत्वाखाली आयोजित केलेल्या या उपक्रमाचे रोहे तालुक्यातील सर्व स्तरातील मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जय गणेश मित्र मंडळाचेअध्यक्ष नितीन माने यांच्या नेत्रुत्वाखाली उपाध्यक्ष प्रविण शिर्के, सचिव दिपेश महाडीक, सह सचिव प्रथमेश घाग, खजिनदार महेश शिर्के, सह खजिनदार उमेश नाईक,सूचित पाटील, विभागातील सामाजीक कार्यकर्ते गणेश शिवलकर,जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबागचे कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले.

पनवेलमध्ये सहा मोबाइल टीमने सुरू केल्या अँटीजेन चाचण्या