राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती अध्यक्षा कु. रुचिका राजेंद्र जैन यांचा पुढाकार, रोह्यात फोटो विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन

रोहा (निखिल दाते): रोहे शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या कार्यक्षम अध्यक्षा, सातत्याने नवीन संकल्पना राबवणाऱ्या कु. रुचिका राजेंद्र जैन यांच्या संकल्पनेतून रोह्यात फोटो विथ बाप्पा या अनोख्या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक  गणेशभक्त हा बाप्पासोबत स्वतः चे व परिवाराचे छायाचित्र घेत असतो हे छायाचित्र प्रत्येकाच्या मनामध्ये कायम असते. सहज म्हणुन काढल्या जाणाऱ्या या छायाचित्रांना थोडे स्पर्धेचे स्वरूप देऊन कु. रुचिका राजेंद्र जैन यांनी गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित केला आहे.

सदर स्पर्धेसाठी गणपती बाप्पाबरोबरचे आपले फोटो, सेल्फी किंवा ग्रूप फोटो पाठवायचे असून प्रत्येक स्पर्धकाला माहीती भरण्यासाठी  ऑनलाईन फॉर्मसाठीची लिंक देण्यात येणार असून या लिंकवर फॉर्म आणि माहिती भरून पाठवायची आहे. स्पर्धकांनी पाठवलेले फोटो व माहीती आयोजक आपल्या फेसबुक पेजवर शेयर करणार असून ज्या फोटोला जास्त लाईक येतील त्यांना विजयी घोषित करण्यात येणार असून असे तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. तिन्ही विजेत्यांना अनुक्रमे 1000, 700, 500 रुपये रकमेची गिफ्ट व्हावचर देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत येणाऱ्या लाईक्स ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

आधिक माहितीसाठी कु. रुचिका राजेंद्र जैन (9890386000) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नगरसेवक राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कु. रुचिका जैन, श्री. सनी जैन, श्री. मनिष ओसवाल, श्री. कल्पेश जैन, श्री. सुनिल कोठारी, कु. आसावरी मोकल, कु. मयुरी काणेकर आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

रोहाजय गणेश मित्र मंडळातर्फे २९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन