रोहे शहराचे वैभव असलेल्या, लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेली एक गाव एक गणेशोत्सव ही प्रथा गेली 98 वर्ष प्रयत्नपूर्वक जतन करणारा रोह्याचा राजा हा रायगड जिल्ह्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असून या रोह्याच्या राजाचा उत्सव  या वर्षी कोरोनाच्या काळात साधेपणाने पण अत्यंत भक्तिभावाने सर्व प्रशासकिय नियमांचे पालन करुन दरवर्षीप्रमाणेच रोह्याची साहीत्य पंढरी असलेल्या भाटे सार्वजनिक वाचनालयात साजरा करण्यात येणार आहे.

हा उत्सव रोहेकरांच्या एकीचे प्रतीक असून एक आदर्श गणेशोत्सव म्हणुन जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात या उत्सवाची ख्याती आहे. रोहे शहराला गावासाठी समर्पण व्रुत्तीने काम करणारे अनेक कार्यकर्ते या उत्सवाने दिले आहेत त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट व उत्सव समिती ही सुजाण कार्यकर्ते घडवणारी कार्यशाळा आहे असे म्हटले तरी ते निश्चितच वावगे ठरणार नाही.

गणेशोत्सवाचे दहा दिवस हे रोहेकरांना नेहमीच हवेहवेसे वाटतात कारण या दिवसात रोहेकरांना सांस्कृतिक मेजवानीची भेट असते मनोरंजनाबरोबरच वैचारिक ज्ञानप्रबोधन करणारे अनेक कार्यक्रम या व्यासपीठावरून प्रस्तुत केले जातात रोहेकर या मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घेत असतात, या वर्षी कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम, चलचित्र, मोठी मुर्ती या गोष्टी करणे शक्य नसले तरी सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करुन उत्सवाची परंपरा या वर्षीही सुरू ठेवण्याचा निर्धार विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री. राजेश काफरे आणि सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे व त्या द्रुष्टीने नियोजन केले आहे.

या वर्षी श्रीं च्या दर्शनासाठी भाटे वाचनालयाच्या बाहेर छोट्या स्क्रीनची व्यवस्था ट्रस्ट तर्फे करण्यात येणार आहे.

पुढील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे शतक मोहोत्सवी वर्ष असल्यामुळे या वर्षी राहीलेली सर्व उणीव पुढील वर्षी नक्किच भरून काढली जाणार असून या वर्षी मुर्तीची उंची जरी छोटी असली तरी रोहेकरांच्या भक्तीची उंची खुप मोठी असल्याने सर्व नियमांचे पालन करुन हा उत्सव साजरा होणार आहे.
                        

प्रतिक्रिया
या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाचे सर्व प्रचलित नियम, अटी, शर्थी यांचे पालन करुन रोह्याच्या गणेशोत्सवाची दैदिप्यमान परंपरा आपण पुढे नेणार आहोत, या देशावर, महाराष्ट्रावर व आपल्या गावावर आलेले हे कोरोनारुपी संकट लवकर दूर व्हावे यासाठी रोह्याचा राजाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात येणार आहे.

राजेश प्रभाकर काफरे, अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहा

पेणमध्ये फक्त १०० कोटींची उलाढाल, गणपती मूर्तींची निर्यात मंदावली