रोहा(निखिल दाते): रायगड जिल्ह्यातील आदर्श युवा मंडळ हा प्रशासनाचा बहुमान  प्राप्त केलेले सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान सणांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित असते.

कोरोनाच्या काळात लॉकडॉऊन व त्यात सामान्य माणसाना हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च हा न परवडणारा आहे. भारत सरकारची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थातच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५ लाखांचा विमा तसेच महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत २ लाख पर्यँत प्रतिवर्षी आरोग्य विमा उपलब्ध आहेत. यामध्ये आता कोरोनाचा उपचारही होत आहे.

शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून या लाभदायी योजनेचा प्रचार प्रसार हवा तेवढा होत नसताना रायगड मध्ये सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानने या योजनांचा प्रसार करायचा ठरविले. गणेशोत्सव सणानिमित्त सुराज्यच्या सदस्यांनी काम सुद्धा सुरू केले आहे.

रायगडमधील अनेक रुग्णांचे या योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे बिल वाचवून मोफत उपचार सुराज्यच्या प्रयत्नामुळे केले गेले.

काही ठिकाणच्या खराब व्यवस्थेमुळे सामान्य लोकांना योजनेंवर विश्वास होत नसतो,मात्र आता तसे होणार नाही याचा प्रयत्न सुराज्य करत आहे.

२०११ च्या जनगणेनुसार आर्थिक निकषांवर बनविल्या गेलेल्या यादीनुसार देशातील ५३ कोटी नागरिक आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी आहेत. ज्यांचे नाव असेल त्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी केशरी,पिवळे,अन्नपूर्णा,अंत्योदय शिधापत्रक असणाऱ्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना कोरोनाच्या काळात या योजनेसाठी सवलत देण्यात आली आहे. सदर योजनेचे ई कार्ड बनविण्यासाठी जवळचे सी.एस.सी. सेंटर किंवा महा ई सेवा केंद्र येथे भेट देणे. अधिक माहितीसाठी सुराज्यला संपर्क करणे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी संस्थापक अध्यक्ष रोशन चाफेकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सुराज्यने या उपक्रमाच शुभारंभ केला.

यावेळी शासकीय योजनांचा विश्वास वाढवूयात, आत्मनिर्भर भारताचा संकल्प करूयात हा नारा सुराज्यने दिला.

त्यावेळी सुमित खरात, मोनिष भगत,अक्षय उगलमुगले, संचित हरिहर,सौरभ पाटील,अभिजित भोसले राहूल पोकळे,रुतीक शेलार, सौरभ भगत, तुषार दिघे,प्रसाद पाटुकले,सागर जाधव, सागर शिरसट उपस्थित होते.या उपक्रमासाठी मयुर धनावडे हाजी कोठारी हे कार्यक्रम प्रमुख म्हणून भुमिका बजावत आहेत. या सर्व सदस्यांसह विविध विविध भागांतील सदस्य या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

संध्या दिवकर यांच्या मराठी गजल मुशायरातील प्रभावी सादरीकरणाचे राज्यस्तरावर कौतुक