रोहा (निखिल दाते): रोह्यातील युवकांची सक्रीय संघटना असलेल्या व मागील वर्षी जिल्हा प्रशासनाचा आदर्श युवा संघटना हा मानाचा किताब प्राप्त केलेल्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रचंड लोकहीताचे कार्य करण्याचा निर्धार स्वातंत्र्यदिनानिमित्त केला.
युवकांच्या सोबतीने येणाऱ्या सर्व संघर्षाचा सामना करत असंख्य कल्पना भविष्यात राबवुन,प्रचंड लोकहिताचे कार्य करण्याचा निर्धार आजच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमिताने केला.
सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानला रायगड जिल्हा युवा पुरस्कार प्रदान होऊन एक वर्ष झाल्यानंतर एका वर्षात व या कोरोनाच्या संकटात अनेक कार्य करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या वतीने केला, यापुढेही हा प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
देशातील युवकांची ऊर्जा ही वायफळ वाया न जाता ती देशहितासाठी खर्च झाली पाहिजे अशा भावना यावेळी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रोशन चाफेकर यांनी व्यक्त केल्या.
आत्मनिर्भर भारतासाठी कोरोनाच्या काळात व त्यानंतरही अनेक शासकीय योजना लोकांच्या घराघरात पोचवून त्यांना लाभ मिळून देण्यासाठी व समाजातील अनेक सामाजिक विषयांवर काम करण्याचा संकल्प स्वातंत्र्यदिनानिमित्त मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत सुराज्य कार्यालयात करण्यात आला .
श्रावणी सोमवार निमित्त किशोर तावडे,सचिन आठवले यांच्या हस्ते पुजा व अभिषेक