सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची अचानक बदली करण्यात आली असून बदली त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी ह्यांची सिडकोच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) पदी नियुक्ती झाली आहे.

तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मंत्रालयात बढती देण्यात आल्यावर त्यांच्या जागी लोकेश चंद्र यांची सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. लोकेश यांच्या काळातच सिडकोने १५ हजार घरांच्या महागृहप्रकल्पाचा शुभारंभ केला.

तसेच, लोकेश यांच्या कारकिर्दीत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक लाख घरे बांधण्याची घोषणाही केली होती. सिडकोचा कारभार लोकेश चंद्र यांच्यावर असताना काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर कोकण विभागिय आयुक्त पदाचा अतिरीक्त भार सोपवण्यात आला होता.

परंतू हे कामकाज सुरुळीत चालू असताना अचानक लोकेश यांची बदली करण्यात आली आहे.

सिडको नवे एमडी डॉ. संजय मुखर्जी हे १९९६ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी आहेत. याआधी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे ते सचिव होते, तसेच मुखर्जी यांनी मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त म्हणून ४ वर्षे काम केले आहे.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भूमिगत जलवाहिन्या, सागरी किनारा मार्ग आणि मलःनिस्सारण प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले.

मुंबई ते अलिबाग रो-रो बोट सेवा पुन्हा सुरू