रोहा (निखिल दाते): रोहे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवणाऱ्या, विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षणाचे धडे देणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती विद्या रोहेकर यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे, कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष शिफारसीतून आदर्श शिक्षक 2020-21 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रीमती विद्या रोहेकर यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आजवर भरीव योगदान दिलेले असून गेली अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात झोकून देऊन काम केले आहे.

आजवर त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल अनेक सन्मान प्राप्त झालेले असून आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आदर्श-शिक्षक-पुरस्कार

७/१२ स्वरूपात बदल, दस्तऐवज समजणे होणार सोपे