रोहा (निखिल दाते): रोहे शहरातील सक्रीय सामाजिक कार्यकर्ते श्री. अजिंक्य बाळाराम रोहेकर यांना आदर्श युवक महाराष्ट्र युथ अवॉर्ड 2020 हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यातील विविध भागातील गुणीजनांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून अजिंक्य रोहेकर यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे दुग्धशर्करा योगच जुळून आला आहे.

श्री. अजिंक्य रोहेकर यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच रोह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पनवेल: पेंधर येथील एक घर कोसळून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; ३ जण जखमी