महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून पर्यटन विकासासाठी काम करण्याची नवपदवीधारक युवकांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (@maha_tourism) ईंटर्नशिप कार्यक्रमाद्वारे राज्यातील नवपदवीधारकांच्या संकल्पनांना चालना दिली जाणार आहे.
ईंटर्नना १० हजार रूपये मानधन व अनुभव प्रमाणपत्र मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे.
पर्यटन क्षेत्रात भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या पदवीधारकांना हि चांगली संधी आहे.