अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग  तसेच 6 किलाेलीटर ऑक्सिजनची क्षमता असलेल्या अद्ययावत आधुनिक मिनी बल्क कंटेनर सिस्टीम पफ इन्सूलेटेड माॅडिफाईड (mini bulk container system puf insulated modified ) यंत्रणेचे उद्घाटन आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, नागरी संरक्षण दलाच्या  रायगड जिल्ह्याच्या उपनियंत्रक राजश्री कोरी, तहसिलदार सचिन शेजाळ, डॉ.अनिल फुटाणे, डॉ.विक्रम पडोळे, डॉ.शितल जोशी, श्री.सिद्धार्थ चौरे, बांधकाम विभागाच्या धनश्री भोसले, सीएसआर हेड आंबेरिन मेमन, एव्हीपी ॲडमिनिस्ट्रेशनचे राहुल गायकवाड, जीव्हीएस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, बारामतीचे सौरभ गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

      जिल्हा रुग्णालयातील या नव्या अतिदक्षता विभागात 40 बेडस् तर 60 ऑक्सिजन बेडस्  उपलब्ध असून यापैकी महसूल विभाग, पोलीस विभाग आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 3 बेडस् आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

        पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि हेक्सावेअर टेक्नॉलॉजी या कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड अशा एकत्रित निधीतून हा अतिदक्षता विभाग व जीव्हीएस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड,  बारामती  यांच्या  सहकार्याने ऑक्सिजन टँक यंत्रणा उभारण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी अद्ययावत अतिदक्षता विभागाची सुविधा तसेच जिल्हा रुग्णालयातील दाखल काेविड रुग्णांना पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी यावेळी दिली.

रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर; जाणून घ्या काय असतील नियम