कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा नवरात्रौत्सव / दूर्गापूजा / दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शासनाने दि. 29 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 मार्गदर्शक सूचना, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन परिपत्रक क्रमांक- आरएलपी -0920 / प्र.क्र .156 / विशा-1,ब, या परिपत्रकाद्वारे सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

काय आहेत या सूचना जाणून घेवूया लेखातून अन् या सूचनांचे पालन करुन शासनाला सहकार्य करु…!

 •  सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील.
 • कोविड -19 मुळे उदवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत.
 • यावर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.
 • देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी.
 • यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे.
 • मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.
 • विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
 • नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.
 • जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे.
 • आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
 • ” माझे कुटुंब-माझी जबाबदारी ” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी .
 • गरबा,दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत.
 • आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे ( उदा.रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू इ . आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी .
 • आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
 • ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे .
 • देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
 • देवीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
 • प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (सोशल डिस्टंन्सिंगचे) तसेच स्वच्छतेचे नियम ( मास्क, सॅनिटायझर इत्यादी ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे .
 • देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.
 • विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
 • लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
 • संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.
 • महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
 • नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त नागरिकांना माहिती द्यावी.
 • मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी .
 • मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.
 • विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.
 • दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा.
 • रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील.
 • प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.
 • कोविड- 19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
 • तसेच यानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनाकडून अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर; जाणून घ्या काय असतील नियम