जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कुशल, अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  हा मेळावा दि. 24 ते दि.26  नोव्हेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत फक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. 

जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता  विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्यावत करावी.  तसेच ज्यांनी  या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर Employment-Job Seeker (Find a Job)-Register या ऑप्शन्सवर क्लीक करुन सर्व अद्यावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदणी करताना भरलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login मध्ये Registration Id (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड भरुन Login वर क्लीक करावे. त्यानंतर दिसणा-या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लीक करुन दिसणा-या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपला जिल्हा निवडून Action-view details  मध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व vacancy listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लीक करावे त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो.

 रिक्तपदांकरीता Apply वर क्लीक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.  त्यामुळे त्यांचेकडील रिक्तपदांकरीता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता आपणाशी संपर्क साधणे शक्य होते. तसेच पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही समस्या येत असेल तर या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 या वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त  शा. गि. पवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन