जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00  या कालावधीत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेबिनारमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना संदर्भात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या  जिल्हा समन्वयक सौ.अंजली पाटील या मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनारमध्ये भाग घेण्यासाठी CISCO WEBEX  हे ॲप प्लेस्टोअर वरुन डाऊनलोड करुन https://mh-dit.webex.com/mh-dit/j.php?MTID=mc66530bd48633715be86645df7bde8b9या लिंकचा वापर करुन दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00  पूर्वी 10 मिनिटे अगोदर सहभाग घ्यावा. सहभाग करताना आपले माईक व व्हिडिओ म्युट/बंद ठेवावेत. आपणांस प्रश्न विचारावयाचा असेल त्याच वेळी आपला माईक अनम्युट करुन प्रश्न विचारावेत.

 जिल्हयातील मराठा समाजातील बेराजगार उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शा.गि.पवार यांनी केले आहे.