रत्नागिरी – भाजपने तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजपमधील अंतर्गत मतभेद दूर करण्यात कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण यांना यश आले आहे. त्याचेच फलित म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन आणि नाराज गटातील माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने मैदानात उतरणार असून त्यांचा 6 जानेवारीपासून संयुक्त दौरा सुरू होणार आहे.
भाजपमधील जुने जानते आणि ग्रामीण भागातील राजकारणाचे बारकावे माहिती असलेला बाळ माने, सतीश शेवडे, नाना शिंदे आदींचा एक गट भाजपच्या प्रवाहातून बाजूला होता. त्याचा फायदा शिवसेना किंवा अन्य पक्षांना निश्चित होणार होता. भाजपची ग्रामीण भागातील ताकद वाढविण्यासाठी या जुन्या आणि निष्ठावंतांना प्रवाहाबरोबर घेण्यासाठी वरिष्ठांनी अनेकवेळा प्रयत्न केले होते. मात्र, समेट घडून आणण्यात अपयश आले.
तालुक्यात 58 ग्रामपंचायत निवडणूक होणार आहेत. आज आर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. पाहिल्या दिवशी पावस, नाखरे, शिवार आंबेरे, डोर्ले, गावखडी, गोळप, भाट्ये या ग्रामपंचायतीचा दौर होणार आहे. 7 तारखेला बसणी, कोतवडे, नेवरे, ओळी, गणपतीपुळे, वरवडे, नांदिवडे, कासारी, खंडाळा, सैतवडे या ग्रामपंचायतींचा दौरा होईल, 8 तारखेला राई, मांजरे, डिंगणी, नावडी, कुरधुंडा, परचुरी, हातखंबा, झरेवाडी तर 9 तारखेला नाचणे, मिरजोळे, दांडेआडम, खेडशी, नाणीज, कशेळळी, खानूू, या ठिकाणी हे दोन नेते भेट देणार आहे. 10 जानावेरीला मिऱ्या, चांदेराई, उंबरे, सोमेश्वर, जुवे या ग्रामपंचायतींचे दोरे करणार आहेत. त्यांच्यासोबत सरचिटणीस राजेश सावंत असणार आहेत.
हे पण वाचा – महाडिक यांनी आता भाजपमध्येच राहावे ; गृहराज्यमंत्री सतेज पाटील
6 जानेवारीपासून दोन्ही नेते दौऱ्यावर
ग्रामीण शिवसेनेची मजबूत पकड आहे. त्यामुळे भाजपला वाढीस कमी वाव आहे. म्हणून रवींद्र चव्हाण यांनी ऍड. दीपक पटवर्धन आणि बाळ माने यांच्यात समेट घडवून आणला आहे. दोघांनाही संयुक्त दौरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. पक्षवाढीसाठी आणि ग्रामपंचायतीवर कमळ फडकविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, असे सांगितले आहे. त्यानुसार 6 जानेवारीपासून दोन्ही नेते ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आहेत.
संपादन – धनाजी सुर्वे