Ankush-Joshte
विध्यार्थी आत्मविश्वास दिनाचे पत्र नगरसेवक दिलीप बारटक्के यांना देताना अंकुश जोष्टे सोबत शाखा प्रमुख हितेंद्र लोटलीकर व नरेश प्रजापत, यशवंत वीर, आणि अमोल जोष्टे

मानवात आत्मविश्वास जागृत करून किंवा वाढून त्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी विध्यार्थी जीवनातून आत्मविश्वास मिळावा त्यासाठी सावरकर नगर ठाणे येथे राहणाऱ्या मूळच्या महाड येथील अंकुश जोष्टेनी विध्यार्थी आत्मविशवास दिनाचा शोध लावला. शाळा कॉलेज व इतर शैशकनिक शेत्रात पहिल्या दिवशी सर्व विध्यार्थी नविन असतात प्रत्येकाचे विचार मने वेगळी असतात त्यासाठी आत्मविश्वास जरूरी असतो. त्यासाठी वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यांना अनुक्रमे फळ्यासमोर उभे राहून इतर विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपले नाव……. माझे स्वपन …….. आहे मी माझ्या प्रेरणास्रोत असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करून, आईवडील आणि गुरुजनांचा सन्मान करून सकारात्मक दृष्टीकोनातून अथक प्रयत्न व मेहनत करून यशस्वी होणारच नि देशाच्या प्रगतीला हातभार लावणार, जय हिंद असे उत्फुर्त पणे संभोधविण्यास लावले तर त्यांचा आत्मविश्वास वाढून देश्याविशी प्रेम् वाढून स्वतःची प्रगती करेल.

अश्या प्रकारचा आत्मविशवास दीन ठाण्यामध्ये साजरा करण्यासाठी स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के यांना पत्र देण्यात आले, ह्यावेळी दिलीप बारटक्के यांनी अंकुश जोष्टे यांचे कौतुक केले, आणि संपूर्ण ठाण्यामध्ये साजरा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये चर्चा करून, तज्ञांची मदत घेऊन तसेच शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो ठाण्यामध्ये साजरा करण्याचे वचन दिले ह्यावेळी अंकुश जोष्टेणी दिलीप बारटक्के व उपस्थीत सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी शाखा प्रमुख हितेंद्र लोटलीकर, नरेश प्रजपत, यशवत वीर,अमोल जोष्टे व इतर उपस्थित होते.